रजनी परांजपे या डोअर स्टेप स्कूलच्या संस्थापिका व अध्यक्ष आहेत. त्यांनी मुंबईतील ‘निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क’ येथे ‘मास्टर ऑफ सोशल वर्क’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि निर्मला निकेतन आणि जपान येथील ‘शिकोकू ख्रिश्चन युनिव्हर्सिटी’ येथे मिळून २० वर्षांपेक्षा जास्त काळ सोशल वर्क संबंधित अनेक विषय शिकविले. तसेच ‘कॉलेज ऑफ सोशल वर्क’ येथे ‘रिसर्च’ विभागप्रमुख म्हणून काम केले आहे.

मुले शाळेपर्यंत पोहोचू शकत नसतील तर शाळा त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, या विचारातून तीन दशकांपूर्वी डोअरस्टेप स्कूल या संस्थेची स्थापना झाली. वस्त्यावस्त्यांमधल्या उपेक्षित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फिरत्या शाळेसह संस्था विविध उपक्रम राबवते. वंचितांचा हा शिक्षणप्रवास आणखी गतिमान करण्याचा संस्थेचा संकल्प आहे.

telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी

मुले शाळेपर्यंत पोहोचू शकत नसतील तर शाळा त्यांच्यापर्यंत पोहोचवू या, या विचाराने १९८९ साली ‘डोअरस्टेप स्कूल’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. रजनी परांजपे आणि बिना यांनी सुरूवातीला वस्तीतच खेळांच्या माध्यमातून शिक्षण द्यायला सुरुवात केली. हळूहळू आजूबाजूच्या वस्त्यांमधील मुलांची स्थितीही त्यांना कळू लागली. संस्थेने ३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी वस्त्यांमध्ये बालवाडी सुरू केली. या वयोगटातील मुले काम करत नाहीत आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायला पालकांना वेळ नसतो. त्यामुळे बालवाडीला चांगला प्रतिसाद मिळाला. १९९१-९२ या शैक्षणिक वर्षांत प्रथमच संस्थेने २० ते २५ मुलांना शाळेत दाखल केले. आता दरवर्षी हजारो मुले शाळेत दाखल होतात.