कानावर पडणारे ‘गीतरामायणा’चे  सूर.. दवण्याचा दरवळणारा सुगंध.. उन्हाच्या तपत्या झळा असतानाही येणारी वाऱ्याची हलकीशी झुळूक.. रामजन्माचे रंगलेले आख्यान.. माध्यान्हीच्या प्रहरी सुवासिनींनी पाळणा हलविला आणि समूहस्वरांत पाळणा गात रामजन्म सोहळा पारंपरिक उत्साहात शुक्रवारी शहरातील विविध मंदिरांमध्ये साजरा झाला. सुंठवडा आणि रामाच्या पागोटय़ाचे सूत हा प्रसाद घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती.
पेशवेकालीन तुळशीबाग मंदिरामध्ये भाविकांची रामजन्मसोहळा आणि दर्शनसाठी गर्दी झाली होती. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडव्यापासून सुरू झालेल्या यंदाच्या उत्सवाचे रामदास तुळशीबागवाले सालकरी आहेत. रामेश्वर मंदिरामध्ये पूजन करून आणण्यात आलेला पोषाख रामाला परिधान करण्यात आला. षोडषोपचार पूजेनंतर प्रणव गोखले यांचे रामजन्माचे कीर्तन झाले. पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरिवद शिंदे यांनी दर्शन घेतले. विजय गंजीवाले, शरद गंजीवाले आणि रवींद्र रणधीर यांनी हाताने काढलेले रामाच्या पागोटय़ाचे सूत प्रसाद म्हणून घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. रात्री आठ वाजता श्रीरामाची छबिना मिरवणूक काढण्यात आली. मंदिरापासून सुरू झालेली ही मिरवणूक दगडूशेठ दत्त मंदिर, रामेश्वर मंदिर चौक, मंडईमार्गे तुळशीबाग अशी नगर प्रदक्षिणा करून पुन्हा मंदिरामध्ये परतली. रविवारी (१७ एप्रिल) वद्य एकादशीला मंदिरामध्ये पायघडय़ा घालून रामाचा प्रतिकात्मक राज्याभिषेक सोहळा केला जाणार आहे. तर, हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी (२३ एप्रिल) सत्यनारायण महापूजेने रामनवमी उत्सवाची सांगता होणार आहे.
शनिवार पेठेतील जोशी श्रीराम मंदिरामध्ये मििलदबुवा बडवे यांचे रामजन्माचे कीर्तन झाले. नवी पेठेतील श्री विठ्ठल मंदिरात गुढी पाडव्यापासून सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. बाळकृष्ण कुलकर्णी यांचे रामजन्माचे कीर्तन झाले. सदाशिव पेठेतील रहाळकर राम मंदिर, सदावर्ते राम मंदिर, नारायण पेठेतील भाजीराम मंदिर येथेही पारंपरिक पद्धतीने रामनवमी साजरी झाली. लोहियानगर येथील श्रीराम समता मंदिरात धार्मिक विधींसह रामजन्म सोहळा झाला. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, नगरसेवक अविनाश बागवे यांच्या हस्ते भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे गुढी पाडव्यापासून सुरू झालेल्या संगीत महोत्सवाची पं. हृदयनाथ मंगेशकर आणि राधा मंगेशकर यांच्या ‘भावसरगम’ कार्यक्रमाने सांगता झाली. लष्कर भागातील सूर्यमुखी साईबाबा मंदिर, शिंपी आळीतील नवयुग तरुण मंडळ व साईबाबा उत्सव समितीतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांनी रामनवमी आणि साईबाबा उत्सव साजरा करण्यात आला.

ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन
Saint Balumamas Rathotsav ceremony ended today with excitement
कोल्हापूर : भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत संत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात