19 September 2020

News Flash

वृद्ध डॉक्टरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

सदाशिव पेठेत राहणाऱ्या एका ७७ वर्षे वयाच्या डॉक्टरवर एका महिलेने केलेल्या तक्रारीनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

| January 24, 2014 02:55 am

सदाशिव पेठेत राहणाऱ्या एका ७७ वर्षे वयाच्या डॉक्टरवर एका महिलेने केलेल्या तक्रारीनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेकडून पैशाची मागणी करून जिवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याबाबतची तक्रारही या डॉक्टरने केली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या परस्परविरोधी तक्रारींनंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ही महिला डॉक्टरांची देखभाल करण्याचे काम करीत होती. या कालावधीमध्ये तिचा सर्व खर्च करण्याचे व घर घेऊन देण्याचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. डॉक्टरांनी या महिलेसह इतर दोघांविरुद्ध तक्रार दिली आहे. संबंधित महिलेने व तिच्या साथीदारांनी आपल्याला धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी त्यांनी तीन लाख रुपये घेतले व आणखी २५ हजारांनी मागणी केली. पैसे दिले नाही तर तुमच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार देऊ, असे सांगून जिवे मारण्याचीही धमकी दिली, असे डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2014 2:55 am

Web Title: rape doctor crime arrested
टॅग Arrested,Doctor
Next Stories
1 भाजी आणि फळे विक्रेतेही एफडीएचे परवाने घेण्यात पुढे
2 चापेकर बंधूंच्या शिल्पसमूहाला मिळाला मुहूर्त
3 शासनाने विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका घ्यावी
Just Now!
X