पुण्यातील पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. विमाननगर भागात एका हॉटेलच्या सुरक्षारक्षकाने चिमुरडीवर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दिलीपकुमार गोस्वामी (२०) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिचे आई वडील एका लेबर कॅम्पमध्ये राहतात. मुलीचे आई वडील कामावर गेल्यानंतर आरोपीने तिला घराबाहेर बोलवून घेतलं. आरोपी ज्या हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षकाचं काम करतो, त्याच्या बाजूला असलेल्या पार्किंगच्या जागेवर नेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला.
या घटनेनंतर पीडित चिमुरडी घरी गेली. त्यावेळी मुलीची आई कामावरून घरी आली होती. मुलगी खूप घाबरलेली दिसल्याने चौकशी केल्यावर तिने सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर मुलीच्या आईने तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं. मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 15, 2021 9:05 am