16 October 2019

News Flash

पिंपरी चिंचवड: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून व्हिडिओ आणि फोटो वायरल करण्याची धमकी

नराधम आरोपीला चिखली पोलिसांनी जेरबंद केलं आहे

संग्रहित छायाचित्र

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ आणि फोटो वायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा शरीरसंबंध ठेण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या नराधमाविरोधात चिखली पोलिसात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधनात्मक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. २८ वर्षीय आरोपी अल्पवयीन मुलीच्या ओळखीचा असून त्याने मुलीच्या आई-वडील आणि बहिणीला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी हे ओळखीचे आहेत. पीडित मुलगी ही इयत्ता ९ ते १० वी शिक्षण घेत होती. नराधम तरुणाने पीडित तरुणीला फुस लावून मैत्रीच्या जाळ्यात ओढले. अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना आरोपी नेहमी तिचा पाठलाग करायचा. एकेदिवशी तिला बाहेर फिरायला घेऊन जाऊन बळजबरीने शारिरीक संबंध ठेवले. आरोपी तरुणाने व्हिडिओ काढत नग्न फोटो काढले. संबंधित घटना पीडित मुलीने आई वडिलांना सांगितली, तेव्हा पीडित मुलीच्या आई वडील आणि बहिणीला आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली.

पीडित अल्पवयीन मुलीसोबत शारिरीक संबंध ठेवताना काढलेले व्हिडिओ आणि फोटो तिच्या वैयक्तिक मोबाईलवर पाठवून पुन्हा शारिरीक संबंधाची मागणी केली. मुलगी घाबरली होती, तिने त्यास नकार दिला असता हेच फोटो पीडित मुलीच्या मावस भावाला पाठवले. ही घटना २०१६ ते २०१९ या वर्षात घडली असून बुधवारी उशिरा मुलीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीला चिखली पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

First Published on May 16, 2019 7:16 pm

Web Title: rape on minor girl and threatened to viral photo and video