19 February 2019

News Flash

पुण्याच्या सर्वेश नावंदेची निवड

शनिवारपासून (१८ ऑगस्ट) १ सप्टेंबपर्यंत हा अभ्यास दौरा असेल.

(संग्रहित छायाचित्र)

पुणे : रशियन सुरक्षा यंत्रणा आणि त्यांच्या संरक्षण खात्यातील अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी भारतातून निवडण्यात आलेल्या २५ युवकांच्या शिष्टमंडळात पुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे याची निवड करण्यात आली आहे. शनिवारपासून (१८ ऑगस्ट) १ सप्टेंबपर्यंत हा अभ्यास दौरा असेल. भारत आणि रशियाचे जुने आंतरराष्ट्रीय संबंध आणखी दृढ करण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्त्वाची भूमिका बजावतो. दोन्ही देशांच्या तंत्रज्ञानाचे आदान प्रदान करण्यासाठी पंतप्रधानांच्या पुढाकाराने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.

First Published on August 14, 2018 2:07 am

Web Title: russian security machinery and their defense department select pune student