पिंपरी-चिंचवडमधील सांगवी परिसरात घरफोड्या करणाऱ्या महिलेला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या महिलेकडून साड्या, महागडा शालू,  एक टीव्ही आणि सोन्याचे दागिने असा ऐकून सव्वा लाख रुपयांचा ऐवज ३० वर्षीय महिलेकडून जप्त करण्यात आले आहे. महिलेने आणखी कुठे घरफोडी केली आहे का हे पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, महिलेचा शोध सीसीटीव्ही वरून लावण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश नामदेव ढेरे हे त्यांच्या कुटुंबासह गावी गेले होते. सोमवारी पहाटे च्या सुमारास त्यांच्या घरी फरफोडी झाली. यात त्यांच्या पत्नीचा महागडा शालू, साड्या, ३२ इंची टीव्ही आणि सोन्याचे दागिने असा एकूण सव्वा लाख रुपयांचा ऐवज ३० वर्षीय महिलेने पळवला. घराचा कडी कोयंडा तोडून या महिलेने घरफोडी केली. पोलीस तपासात हे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, आरोपी महिलेचा पती मद्यपान करून बेदम मारहाण करत त्यामुळे महिलेने पळून जाण्यासाठी पैसे नसल्याने हे कृत्य केलं असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. महिलेला चार मुले असून त्यांचा शिक्षणाचा खर्च देखील महिलाच करत होती. तर पती हा काही काम करत नव्हता. त्यामुळे महिलेला हे पाऊल उचलावे लागल्याचे सांगण्यात येते. सदर चा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.