21 January 2021

News Flash

मोदींचा पुणे दौरा : सीरम इन्स्टिटय़ूट परिसरातील बंदोबस्त वाढवला

मोदीच्या ताफ्यातील तीन विशेष गाड्या देखील सीरम इन्स्टिटय़ूटच्या परिसरात दाखल

करोनावरील लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिटय़ूट आणि जिनोव्हा बायो फार्मासिटिक्युअल्स कंपनीला भेट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (२८ नोव्हेंबर) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. शनिवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी कंपनीला भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेणार आहे. मात्र त्यापूर्वीच शुक्रवारी कंपनीच्या आसपासच्या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाकडून या भागामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पुण्यातील मांजरी येथील सीरम इन्स्टिटय़ूट आणि जिनोव्हा बायो फार्मासिटिक्युअल्स कंपनीत कोविशिल्ड लस तयार करण्यात येत आहे. त्या लसीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उद्या पंतप्रधान मोदी हे दुपारी एक ते दोन या वेळेत येणार आहेत. त्यावेळी सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्यासह शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी मोदी संवाद साधणार आहेत. भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने दुपारी साडेबाराच्या सुमारास मोदी लोहगाव येथील विमानतळावर दाखल होतील. तेथून हेलिकॉप्टरने ते सीरम इन्स्टिटय़ूट येथील हेलीपॅडवर एक वाजण्याच्या सुमारास दाखल होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातील तीन विशेष गाड्या देखील सीरम इन्स्टिटय़ूटच्या परिसरात दाखल झाल्या आहेत.

पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत अधिकृत माहिती गुरुवारी देण्यात आली. मात्र, पंतप्रधानांच्या दौऱ्याची तयारी करण्याबाबत जिल्हा प्रशासन मंगळवारपासूनच सुरु करण्यात आली आहे. राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी यासंदर्भातील आदेश जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती दिली होती. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर विविध देशांचे राजदूतही पुणे दौऱ्यावर येत आहेत. अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफर्ड  विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीचे उत्पादन पुण्याच्या सीरम इन्स्टिटय़ूटकडून घेण्यात येत आहे. चाचण्यांचे विविध टप्पे प्रगतिपथावर आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी पुण्यात येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 3:51 pm

Web Title: serum institute of india pune modi visit security beefed up svk 88 scsg 91
Next Stories
1 पुणे: बंद खोलीत मृतदेह सापडल्याने खळबळ
2 मराठीविषयक मंडळांना पुनर्रचनेची प्रतीक्षाच
3 ‘स्वाध्याय’मधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्याचे निर्देश
Just Now!
X