29 September 2020

News Flash

अपंग, कर्णबधिर व्यक्तींसाठी रविवारी नोकरी मेळावा

‘विशेष’ या सामाजिक संस्थेने शारीरिकदृष्टय़ा अपंग व कमी ऐकू येणाऱ्या व्यक्तींसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे.

| June 15, 2013 02:39 am

‘विशेष’ या सामाजिक संस्थेने शारीरिकदृष्टय़ा अपंग व कमी ऐकू येणाऱ्या व्यक्तींसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. १६ जून रोजी (रविवार) गणेश खिंड रस्त्यावरील बालकल्याण संस्थेत सकाळी १० ते १ या वेळेत हा मेळावा होणार आहे.
३२ वर्षांखालील कोणत्याही शाखेच्या (कला, वाणिज्य, विज्ञान, बी- टेक इ.) पदवीधर व्यक्ती या मेळाव्याचा लाभ घेऊ शकणार आहेत. नोकरीचा अनुभव असणाऱ्यांबरोबरच विनाअनुभव उमेदवारही मेळाव्यात सहभागी होऊ शकणार आहेत.
उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती बरोबर घेऊन येणे आवश्यक आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही, असे संस्थेने कळवले आहे. अधिक माहितीसाठी ९१६७१११३९७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 2:39 am

Web Title: service rally for disabled and deaf persons by vishesh
Next Stories
1 आराखडय़ात संरक्षण खात्याच्या जमिनीवरही महापालिकेचा डल्ला
2 पुणे बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षांविरुद्ध आरोप निश्चित
3 विमा पॉलिसीसाठी दोन महिन्यांत ‘ई-पॉलिसी’ पद्धतीचा अवलंब – टी. एस. विजयन
Just Now!
X