द इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडियातर्फे (आयसीएसआय) घेण्यात आलेल्या कं पनी सचिव (सीएस) एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (सीएसईईटी) या परीक्षेत ७७.२४ टक्के  विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यंदा पहिल्यांदाच ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती.

आयसीएसआयने गुरुवारी निकाल जाहीर के ला. करोना संसर्गामुळे ही परीक्षा लांबली होती. मात्र, आयसीएसआयतर्फे २९ आणि ३१ ऑगस्टला ही परीक्षा घेण्यात आली. देशभरातून परीक्षा दिलेल्या सुमारे ५५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी ७७.२४ टक्के  विद्यार्थी पात्र ठरले. सीएस अभ्यासक्रमाचे फाउंडेशन, एक्झिक्युटिव्ह आणि फायनल असे तीन टप्पे होते. त्यात बदल करून फाउंडेशन पातळी न ठेवता सीएस एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (सीएसईईटी) घेण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पात्रता वर्षभर वैध ठेवण्यात आली आहे.