News Flash

पिंपळे सौदागर येथे मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय; पोलिसांच्या छाप्यात ५ युवतींची सुटका

थायलंड येथिल मुलींचा समावेश

Mumbai : यापूर्वी चेंबूरमध्ये जुलै महिन्यात कांचन नाथ या मॉर्निंग वॉकला गेल्या असताना त्यांच्या अंगावर नारळाचे झाड पडले होते. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी पालिकेने जोरदार वाऱ्यांमुळे झाड पडल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली होती.

शहरातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर येथील शिवार गार्डन परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली चालवलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा सांगवी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळारून थायलंड येथील ५ युवतींची सुटका केली आहे. तसेच शिवा मसाज पार्लर चालवणा-या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीवरून काल (दि.28) रात्री उशिरा पोलिसांनी छापा टाकत थायलंडच्या पाच तरुणीची सुटका केली. आरोपी अमोल जाधव आणि त्याचा आणखी एक साथीदार हा पिंपळे सौदागर येथे शिवा मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यसाय चालवत होते. विशेष म्हणजे पिंपळे सौदागर येथे उच्चभ्रू नागरिक राहतात. या प्रकरणी सांगवी पोलिसांत अमोल जाधव आणि आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलिसांनी ही कामगिरी केली. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का? याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 6:17 pm

Web Title: sex racket in massage parlor demolished at pemple saudagar five foreign girls free
Next Stories
1 धक्कादायक! : मामाकडून अकरा वर्षीय भाचीवर बलात्कार
2 माती वाहिली, मग भराव टाकले.. तेही खचले!
3 शहरातील नाटय़गृहांमधील स्वच्छतागृहे चकाचक
Just Now!
X