News Flash

“शरद पवार गुगली टाकण्यात ‘एक्सपर्ट’ आहेत”; मोदी-पवार भेटीवर सुशीलकुमार शिंदेंची प्रतिक्रिया

नाना पटोले जे बोलत आहेत ते सत्य आहे, असं देखील म्हणाले आहेत.

सहकार खातं अमित शहा यांच्याकडे दिले आहे, त्याबद्दलही बोलले आहेत.

“पंतप्रधान मोदी व शरद पवार यांची बैठक झाली, काळजी करण्याचं काही कारण नाही. शरद पवार हे गुगली टाकण्यात एक्सपर्ट आहेत. त्यांनी अशा अनेक गुगल्या टाकलेल्या आहेत. त्यामुळे त्याबाबत काळजी करण्याचं कारण नाही. महाविकासआघाडी सरकार एकदम भक्कम आहे. त्यांना काहीही धक्का लागणार नाही.” असं काँग्रेस नेते व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत.

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, तासभर झाली चर्चा; तर्क-वितर्कांना उधाण!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण अल्याचं दिसून आले. सर्व सामान्य कार्यकर्त्यापासून ते राजकीय जाणकारांपर्यंत अनेकजण या भेटीबद्दल अंदाज वर्तवू लागले. जवळपास एक तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून या भेटी मागचे नेमके कारण सांगण्यात आले. दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी देखील पुण्यात माध्यमांशी बोलताना याबाबत आपली प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी – शरद पवार यांच्या भेटीवर संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तसेच, यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पाठराखण केल्याचेही दिसून आले. “नाना पटोले जे बोलत आहेत ते सत्य आहे, आम्ही आमच्या पक्षाची बाजू मांडणारच ना? पक्ष खंबीर करण्याचा प्रयत्न करणारच. आम्ही तिथं एकत्र असलो म्हणून आमचा पक्ष आम्ही तोडमोडीला काढणार नाही. सोबत आहे तोपर्यंत जवळ राहणार पण जेव्हा आमच्या पक्षाची उभारणी करायची आहे, ती आम्ही करतच राहणार.” असं त्यांनी बोलून दाखवलं.

दिल्लीत शरद पवारांच्या गाठीभेटींबाबत नवाब मलिक यांनी दिली माहिती, म्हणाले…

याचबरोबर, सहकार खातं अमित शहा यांच्याकडे दिले आहे. त्यामुळे राज्यातील सहकार खात्यावर परिणाम होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर ते म्हणाले की, “मला असं काही वाटत नाही. आपल्या महाराष्ट्रातील सहकार चळवळ खंबीरपणे उभी आहे. कोणीही आले तरी ती चांगले काम करतात. त्यामुळे कोणीही आलं तरी डिस्टर्ब होणार नाही.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 9:40 pm

Web Title: sharad pawar is an expert in throwing googly sushilkumar shinde reaction to modi pawar meeting msr 87 svk 88
Next Stories
1 पोलीस आणि नागरिकांमध्ये संवाद वाढावा यासाठी झाला ‘हा’ निर्णय!
2 राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस पुणे दौर्‍यावर!
3 पुणे : तापलेल्या रॉडने वार, नंतर पोलिसांना फोन…; वीटभट्टी ते हॉटेल ‘माणुसकी’… वाचा कुठे काय घडलं?