दोन दिवस घडलेल्या नाटय़पूर्ण घडामोडींनंतर शिक्षण प्रसारक मंडळीची निवडणूक बुधवारी शांततेत झाली. संस्थेच्या ३ हजार प्रत्यक्ष मतांपैकी साधारण १ हजार मतदान झाले आहे.
बोगस मतपत्रिका, माजी विश्वस्त, अध्यक्षांना अटक, आरोप-प्रत्यारोप अशा नाटय़पूर्ण घडामोडींनंतर शिक्षण प्रसारक मंडळीची निवडणूक शांततेत पार पडली.
परिवर्तन, शिक्षणमित्र, लोकमान्य या तीन पॅनेलबरोबर काही वैयक्तिक उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. या वेळी पुणे, मुंबई, सोलापूर अशा तीन केंद्रांवर ३ हजार १०० प्रत्यक्ष मतदान होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तीनही केंद्रांवर मिळून १ हजार ७६ मतदान झाले आहे. त्यापैकी पुण्यात ८६०, सोलापूर येथे १६२ आणि मुंबई येथे ५४ सदस्यांनी मतदान केले. मतमोजणी गुरुवारी (३१ मार्च) सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे, अशी माहिती धर्मादाय उपायुक्त नितीन जाधव यांनी दिली.