News Flash

कात्रज घाटात शिवशाही उलटली, एकाचा मृत्यू ३० पेक्षा जास्त प्रवासी जखमी

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत

पुण्याहून सांगलीकडे जात असताना कात्रज घाटात शिवशाही बस उलटून ३० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे. पुण्याहून सांगलीकडे जाणारी बस कात्रज घाटात ५० फूट दरीत कोसळली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातून सांगलीच्या दिशेने शिवशाही बस आज दुपारी जात होती. ही बस कात्रज घाटाच्या शिंदेवाडी जवळ येताच, एका वळणावर ५० फूट दरीत चार वेळा पलटी होऊन कोसळल्याची घटना घडली.  या बसमध्ये एकूण ४० प्रवासी होते, त्यातील ३० जण जखमी झाले असून ६ जण गंभीर आहेत. या सर्व जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आली असल्याची माहिती अग्नीशमन विभागाकडून देण्यात आली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2019 4:19 pm

Web Title: shivshai bus accident at katraj ghat one dead 30 injured scj 81
Next Stories
1 हवामान बदलाचा मुलांच्या आरोग्याला धोका!
2 राज्यात गारवा वाढला!
3 पुणे : हवेत गोळीबार करत ज्वेलर्सचे दुकान लुटले
Just Now!
X