News Flash

धक्कादायक! पुण्यात आढळलेल्या ‘त्या’ बनावट नोटांची किंमत तब्बल ८७ कोटी

सहा जणांना घेतले ताब्यात

प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्यातील विमानतळ परिसरातील काल (बुधवार) एका खोलीमध्ये कोट्यवधी रूपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या. रात्री उशीरापर्यंत या नोटांची मोजणी सुरु होती. सर्व नोटा मोजल्यानंतर त्याची एकूण किंमत तब्बल ८७ कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिली.

पोलिसाच्या माहितीनुसार, विमानतळ भागात बनावट नोटा येणार असल्याची माहिती काल गुन्हे शाखा आणि लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले. यावेळी आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी नोटा असलेल्या ठिकाणाची माहिती दिली. संबंधित ठिकाणाची पाहणी केल्यानंतर एका खोलीत दोन हजार, एक हजार, पाचशे आणि शंभर रुपयांच्या नव्या आणि चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटाही आढळून आल्या.

रात्री उशीरापर्यंत या सर्व नोटांची मोजणी सुरु होती. सर्व नोटांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर त्या तब्बल ८७ कोटी रुपये किंमतीच्या असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या सहा आरोपींकडे चौकशी सुरू असून या सहा जणांमध्ये लष्करातील एका जवानाचा देखील सहभाग असल्याचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 1:49 pm

Web Title: shocking the counterfeit notes found in pune are worth rs 87 crore aau 85 svk 88
Next Stories
1 आळंदीमध्ये करोनाबाधित महिलेच्या मृत्यूने खळबळ; मंदिर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित
2 करोनामुळे नेत्रदानाची टाळेबंदी
3 पुन्हा ‘सीसीटीव्ही’ची नजर
Just Now!
X