20 April 2019

News Flash

अबब! दगडूशेठ गणपतीला १२६ किलो मोदकाचा प्रसाद

अतिशय आकर्षक दिसणाऱ्या या मोदकाला चांदीचा वर्खही लावण्यात आला आहे. मोदकाच्या वरच्या भागाला सोन्याचा वर्ख देण्यात आला आहे.

सौजन्य - एएनआय

श्रीमंत दगडूशेठ गणपतीची भक्ती ही पुण्यातच नाही तर परदेशातही पोहोचली आहे. पुण्याच मानाचे स्थान असलेल्या या गणपतीला भाविक अतिशय भक्तीभावाने पूजतात. गणेशोत्सवाच्या काळात भक्त या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी तासनतास रांगेत थांबतात. आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला नवसही बोलला जातो. मनातील इच्छा पूर्ण झाल्यावर भक्त बाप्पाची पुन्हा भक्तीभावाने पूजाअर्चा करतात. अशाच बाप्पाच्या एका भक्ताने आपल्या या लाडक्या दैवतासाठी एक अनोखी भेट दिली आहे. बाप्पाला आवडणाऱ्या मोदकाचा प्रसाद या भक्ताने दिला आहे. पण हा मोदक एक-दोन नाही तर तब्बल १२६ किलोंचा आहे. आता १२६ किलोच का असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल, तर यंदा मंडळाने १२६ वर्ष पूर्ण केली असल्याने १२६ किलोंचा मोदक करण्यात आला आहे.

आपण बोललेल्या नवसाची पूर्तता झाल्याने या भक्ताने हा मोदक अर्पण करण्यात आला. काका हलवाई यांनी हा मोदक बनवला आहे. हा मोदक पूर्णत: माव्याटा बनविण्यात आला असून काजू, बदाम, पिस्ते, मनुके अशा सुकामेव्याने तो सजविण्यात आला आहे. याबरोबरच अतिशय आकर्षक दिसणाऱ्या या मोदकाला चांदीचा वर्खही लावण्यात आला आहे. मोदकाच्या वरच्या भागाला सोन्याचा वर्ख देण्यात आला आहे. गणेशापुढे हा मोदक अर्पण करण्यात आला असून त्याचा बाप्पाला नैवेद्य दाखविण्यात आला. हा मोदक भक्तांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे.

First Published on September 14, 2018 12:10 pm

Web Title: shrimant dagdusheth halwai ganpati pune 126 years completed modak of 126 kg