जिल्हाधिकारी कार्यालयात सी-व्हिजिल नियंत्रण कक्ष कार्यान्वित

पुणे : लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांकडून आचारसंहितेचा भंग झाल्यास नागरिकांना ‘सी-व्हिजिल’ अ‍ॅपच्या माध्यमातून थेट तक्रार करता येणार आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये तक्रारीची दखल घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा, संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सी-व्हिजिलचा स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, पहिल्याच दिवशी सहा तक्रारी प्राप्त झाल्या.

केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच सी-व्हिजिल मोबाइल अ?ॅप तयार केले आहे. या अ?ॅपच्या माध्यमातून नागरिकांना आचारसंहिता भंगचा प्रकार निदर्शनास आल्यास थेट मोबाइलवर छायाचित्र काढून किंवा दोन मिनिटांची चित्रफीत तयार करून तक्रार दाखल करता येणार आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर वीस मिनिटांत तक्रारीची दखल घेऊ न कारवाई होणार असून तक्रारदाराची माहिती गोपनीय राहणार आहे. तक्रारदाराला तक्रारीवर काय कार्यवाही केली याची माहिती मिळणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित जिल्हा अशा एकवीस विधासनभा मतदार संघनिहाय विभाग तयार करण्यात आले

असून भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. विधानसभा मतदार संघनिहाय विभागांतर्गत प्रत्येक ठिकाणी निवडणूक विभागाचा एक समन्वयक अधिकारी, एक पोलिस अधिकारी यांचे मोबाइल क्रमांक सव्‍‌र्हरद्वारे जोडण्यात आले आहेत, अशी माहिती माहिती सी-व्हिजिल नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी सुरेश जाधव यांनी दिली. सी-व्हिजिल अ‍ॅपद्वारे पहिल्याच दिवशी नियंत्रण कक्षाकडे सहा तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्या असून त्यावर प्राथमिक कारवाई करण्यात आली आहे, असेही जाधव यांनी सांगितले.

सी-व्हिजिल असे काम करेल

एखाद्या व्यक्तीने छायाचित्र किंवा चित्रफीत तयार करून तक्रार केल्यास जीपीएस ट्रॅकिंगद्वारे संबंधित तक्रार कोणत्या विभागातून आहे, या माहितीसह जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाकडे तक्रारीचा संदेश प्राप्त होईल. नियंत्रण कक्षातून तत्काळ संबंधित मतदार संघाच्या समन्वय अधिकाऱ्याकडे, पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार पाठवली जाईल. हे अधिकारी तक्रार ठिकाणावरून जवळ असल्यास स्वत: जाऊ न शहानिशा करतील किंवा भरारी पथकातील कर्मचा?ऱ्यांना तेथे पाठवण्यात येईल. स्थानिक अधिका?ऱ्यांनी तक्रारीनुसार काय कार्यवाही केली, याबाबत विभागीय अधिका?ऱ्यांकडे माहिती जाईल. संबंधित विभागीय अधिका?री तक्रारीमध्ये तथ्य असल्यास ते ती तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर दाखल करतील.

चोवीस तास नियंत्रण कक्ष कार्यरत

सी-व्हिजिल अ‍ॅपद्वारे प्राप्त तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापण्यात आला आहे. या कक्षाचे समन्वय अधिकारी सुरेश जाधव यांच्या अंतर्गत ६ नियंत्रण अधिकारी, ८ कर्मचारी अशी पंधरा जणांची नेमणूक करण्यात आली आहे. हा कक्ष चोवीस तास कार्यान्वित राहणार असून, एका वेळेला तीन नियंत्रण अधिकारी, एक वरिष्ठ अधिकारी आणि चार कर्मचारी कार्यरत राहतील.