News Flash

पुण्यातील मंचरमध्ये ६ वर्षाचा मुलगा पडला २०० फूट बोअरवेलमध्ये

अंधार पडल्याने शोधकार्यात अडचणी

पुण्यातील मंचर येथे सहा वर्षांचा मुलगा २०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला आहे. रवी पंडित असे या लहानग्याने नाव असून खेळता खेळता तो बोअरवेलमध्ये पडला. तो केवळ १० फूटांवर अडकला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मंचर पोलीसही याठिकाणी उपस्थित आहेत. तर घटना समजताच एनडीआरएफची तुकडी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर त्याला बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. सायंकाळ झाल्याने अंधार पडल्यामुळे या मदतकार्यात अडचणी येत असल्याचेही समजले.

या परिसरात रस्त्याचे बांधकाम सुरु असून अनेक कामगार या कामात सहभागी आहेत. रवीचे आई-वडिलही  बांधकाम मजूर असल्याने तोही आई-वडिलांसोबत याठिकाणी होता.  बोअरवेलवर कोणतेही झाकण नसल्याने खेळता-खेळता ६ वर्षांचा रवी थेट बोअरवेलमध्ये पडला. सायंकाळी ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2019 7:35 pm

Web Title: six year old boy fall into 200 feet deep borewell in pune manchar
Next Stories
1 पिंपरी-चिंचवड : बांधकाम सुरु असलेल्या मंदिराचा स्लॅब कोसळला; एका महिलेसह तिघांचा मृत्यू
2 तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ; पतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात
3 एकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही
Just Now!
X