पुणे : ज्येष्ठ क्रीडा संघटक आणि क्रीडा पत्रकार प्रल्हाद सावंत (वय ६९) यांचे गुरुवारी पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेची धुरा चार दशके सांभाळताना त्यांनी महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना, भारतीय अॅथलेटिक्स महासंघ यांच्या विविध पदांवर कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात आशियाई क्रॉस कंट्री, आशियाई अॅथलेटिक्स, आशियाई ग्रां.प्रि. अॅथलेटिक्स तसेच अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवले होते. ‘दै. सकाळ’ वृत्तपत्रात क्रीडा पत्रकार म्हणून कार्यरत असताना सावंत यांनी ऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धाचे वार्ताकन केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 9, 2018 8:57 pm