News Flash

जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर पलटली एसटी बस

जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर भोकारपडा येथे सोमवारी सकाळी एसटी बसला अपघात झाला.

जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर पलटली एसटी बस

जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर भोकारपडा येथे सोमवारी सकाळी एसटी बसला अपघात झाला. एसटी बस बोरीवलीहून सोलापूरच्या दिशेने जात असताना ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले व अपघात घडला.यामध्ये एसटी बस पलटी झाली.

राष्ट्रीय महामार्ग चारवर हा अपघात घडला. सात ते आठ प्रवासी या अपघातात जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये एकूण ३७ प्रवासी होते. नितीन लोटके, सचिन चांदणे, पापु रोकडे, पुष्पा तानाजी कांबळे, रंजना पोहोकर अशी जखमींची नावे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2019 1:45 pm

Web Title: st bus accident on old mumbai pune road dmp 82
Next Stories
1 पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास माहितीये का?
2 Ganapati Utsav 2019 : जाणून घ्या पुण्यातील पाच मानाचे गणपती आणि त्यांचं महत्व
3 टाटा मोटर्समध्ये पुन्हा आठ दिवसांचा ‘ब्लॉक क्लोजर’
Just Now!
X