20 September 2020

News Flash

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाला हिरवा कंदील

पिंपरी- चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते. यामुळे महाराष्ट्रासह भारताच्या काना-कोपऱ्यातून नागरिक रोजगारानिमित्त पिंपरी- चिंचवडमध्ये येतात. या शहराची लोकसंख्या ही १८ ते २१

संग्रहित छायाचित्र

पिंपरी- चिंचवडमध्ये नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात ग्रामीण भागातील ५ आणि पुणे शहरातील ९ पोलीस ठाण्यांचा समावेश केला जाणार आहे. मुख्यालयासाठी तात्पुरती भाड्याने जागा घेण्यात येईल, असे समजते.

पिंपरी- चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते. यामुळे महाराष्ट्रासह भारताच्या काना-कोपऱ्यातून नागरिक रोजगारानिमित्त पिंपरी- चिंचवडमध्ये येतात. या शहराची लोकसंख्या ही १८ ते २१ लाखांच्या घरात आहे. गेल्या काही वर्षांपासून पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी वाढली असून शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय करावे, अशी मागणी जोर धरत होती. अखेर या मागणीची दखल घेत राज्य सरकारने पोलीस आयुक्तालयाला मंजुरी दिली. १ मे रोजी स्वतंत्र आयुक्तालय होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्र्यांनी विधी मंडळात पिंपरी-चिंचवड,कोल्हापूर,मीरा भाईंदर या शहरात पोलीस आयुक्तालय होणार असल्याची घोषणा केली होती. गेल्या महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तालयासाठी जागा शोधायला सुरुवात केली होती. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील महत्वाच्या आणि मोक्याच्या जागांची पडताळणी केली होती.

पिंपरी-चिंचवड शहराची वाढ होत असताना गुन्हेगारीतही वाढ झाली. शहरावरती दहशत आणि वर्चस्व निर्माण करण्यासाठी अनेक टोळ्यांचे आपापसात वाद झाले, यातूनच गुन्हेगारीने डोके वर काढत खुनाचे प्रकार घडले आहेत. आता पोलीस आयुक्तालयामुळे शहरातील गुन्हेगारीवर वचक निर्माण होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 4:45 pm

Web Title: state cabinet nod for police commissionerate for pimpri chinchwad
Next Stories
1 राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना कार्यकर्त्यांना भाजपात आणा, गिरीश बापटांचा सल्ला
2 भ्रष्टाचाराचे आरोप खोटे निघाल्यास मला कुठेही फाशी द्या, धनंजय मुंडेंचे सरकारला आव्हान
3 उपचाराच्या नावाखाली नको त्या ठिकाणी स्पर्श करणाऱ्या आयुर्वेदीक डॉक्टरला पुण्यातून अटक
Just Now!
X