News Flash

राज्य नाट्य स्पर्धेत ‘अग्निदिव्य’ नाटक सादर करताना सागर चौघुले या कलाकाराचा मृत्यू

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा तो सख्खा भाचा होता.

सागर चौगुले

रंगभूमीवर नाट्यप्रयोग सादर करत असतानाच एका उमद्या कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू झाला. टिळक स्मारक रंगमंदिर येथे रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. शाहू महाराजांंच्या जीवनावर अधारित ‘अग्निदव्य’ हे नाटकात शाहू महाराजांची मुख्य भूमिका सादर करत असतानाच ३८ वर्षीय सागर शांताराम चौघूले याचा मृत्यू झाला.  सागरच्या मागे आई, एक भाऊ, वहिनी, पत्नी आणि दिड वर्षांची मुलगी असा परिवार आहे. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा तो सख्खा भाचा होता.

आज पुण्यातील टिळक स्मारक रंगमंदिरामध्ये राज्य नाट्य स्पर्धेची अंतीम फेरी सुरु होती. कोल्हापूरचा संघ या स्पर्धेच्या अंतिम पेâरीत पोहचला होता. आज हा संघ ४० कलाकारांसह ‘अग्निदिव्य’ हे शाहू महाराजांच्या जीवनावरील नाटक सादर करत होता. नाटकाच्या सुरवातीपासून शाहू महाराजांच्या मुख्य भूमीकेत असलेल्या सागर चौघुले यांनी प्रक्षकांची वाहवा मिळवीली होती. मात्र, नाटकाचा मध्यांतर होण्याआधीच नाटकातील आपले संवाद म्हणतानात सागरला हृदयविकाराचा तिव्र झटका आला आणि तो रंगमंचावर कोसळला. सहकलाकारांनी तातडीने त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कोणताही प्रतिसाद देत नसल्याने त्याला पुणा हॉस्पिटलला हलविण्यात आले. पुना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर सागरचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.

सागर हा मुळचा कोल्हापूरचा असून चित्रपट निर्माते शांताराम चौघूले यांचा मुलगा आहे. सागरचा कोल्हापूरमध्ये जहिरात क्षेत्राशी निगडीत व्यावसाय आहे. मात्र, अभिनयाच्या आवडीमुळे महाविद्यालयीन वयापासूनच तो नाटकांमध्ये भाग घेत होता. राज्य नाट्य स्पर्धेपुर्वीच सहा महिन्यांपुर्वीच ‘अग्निदिव्य’ हे नाटक बसविले होते. या नाटकात त्याने केलेल्या शाहू महाराजांच्या भूमीकेस सर्वच स्थरांतून वाहवा मिळत होती. आजही पुण्यात नाटक सादर करताना त्याने सर्वच रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळविली होती. सागरने ननाटकाबरोबर काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. लवकरच त्याचा ‘सासू आली अडचण झाली’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 12:05 am

Web Title: state drama competition sagar chougule agnidivya marathi drama
Next Stories
1 पिंपरीत सात हजारांची लाच घेताना महिला तलाठी जाळ्यात
2 बालगंधर्व रंगमंदिरात तोडफोड; प्रवेश न दिल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ
3 पुण्यातील महापालिकेच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूकडून कबड्डीचे धडे
Just Now!
X