महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवारी पुण्यामध्ये होते. येथील मुकुंदनगरमधील महाराष्ट्र मंडाळाच्या कटारिया हायस्कूलमधील वास्तूचे भूमिपूजन राज यांच्या हस्ते पार पडले. राज येणार असल्याने सकाळपासूनच शाळेमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र राज हे कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर एक मजेदार किस्सा घडला.

राज येणार असल्याने काटारिया हायस्कूलच्या आवारामध्ये त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. पोलिसांचा बंदोबस्तही या ठिकाणी होता. शाळेतील वास्तूचे भूमिपूजन असल्याने अनेक शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी उपस्थित होत्या. अयोध्येचा निकाल लागल्यानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आणि ते कार्यक्रम स्थळाकडे निघाले. त्यावेळेस राज यांच्या हाताला असणाऱ्या बॅण्डएड पाहून एका विद्यार्थिने त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. “राजसाहेब तुमच्या हाताला नक्की काय झालं आहे? खूप दुखतयं का?,” असा सवाल तिने राज यांना केला. मात्र राज यांनी तिला काहीच उत्तर दिले नाही. तरी एवढ्यावरच न थांबता त्या विद्यार्थिनेने आपले प्रश्न सुरुच ठेवले. “राजसाहेब तुमच्या हाताला मुंग्या चावल्या का?,” असाही प्रश्न तिने राज यांना विचारला. हा प्रश्न ऐकून मात्र राज यांना हसू आले. मात्र आपले हसू गालातल्या गालात दाबत ते पुढे निघून गेले.

Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
nashik crime news, nashik frau marathi news
नाशिकमध्ये कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेत फसवणूक, दोन सावकारांविरोधात गुन्हा; छाप्यात करारनामे, कोरे मुद्रांक, धनादेश जप्त

दरम्यान, राज यांच्या उजव्या हाताला टेनिस एल्बो झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून त्यांना हा त्रास होत असल्याचे समजते.

नक्की वाचा >> सचिन तेंडुलकरचं दुखणं राज ठाकरेंना

नक्की वाचा >> राज ठाकरे, सचिन तेंडुलकर यांना झालेला टेनिस एल्बो नक्की आहे तरी काय?

काही दिवसांपूर्वीच मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांची भेट घेतल्याचे फोटो ट्विट करण्यात आले होते. त्यावेळी त्या फोटोंपैकी एका फोटोमध्ये राज ठाकरेंच्या हाताला दुखापत झाल्याचं दिसतं आहे.