हवाई दलाच्या लोहगाव विमानतळावर कार्यरत असलेल्या एका सुभेदाराने मंगळवारी सकाळी स्वतःजवळील खासगी रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली. घटनास्थळी एक पत्रही (सुसाईड नोट) सापडले असून, आत्महत्येपूर्वी ते लिहिले असल्याची माहिती मिळाली आहे. बिअंत सिंग असे या जवानाचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बिअंत सिंग यांनी त्यांच्या राहत्या खोलीमध्येच स्वतःवर दोन गोळ्या झाडल्याचे हवाई दलाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ते सध्या एकटेच राहात होते. त्यांच्या नातेवाईकांना या घटनेबद्दल माहिती देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी पुणे पोलीस आणि सैन्य पोलीस यांच्याकडून तपास सुरू करण्यात आला आहे.