24 November 2020

News Flash

मित्राचा खून करून आरोपी पोलीस ठाण्यात हजर; गुन्ह्याची दिली कबुली

मृत तरुणाने काही दिवसांपूर्वी तिघांपैकी एकाला मारहाण केली होती

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवडमध्ये पूर्ववैमनस्यातून तीन मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे त्यांनी पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुलीही दिली. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली असून वॉश बेसिनचे भांडे डोक्यात घालून खून केल्याची कबुली एका आरोपीने पहाटे चिंचवड पोलिसांना दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, शुभम साठे (वय २०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी स्वप्नील भारत कापरे, ज्ञानेश सुनील थोरात, अजय मोहन क्षीरसागर (तिघेही रा. समता कॉलनी) असे स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेल्या आरोपींची नावे आहेत.

मृत शुभम आणि आरोपी हे मित्र असल्याने मध्यरात्री हॉटेल खुशबूच्या पाठीमागे दारु प्यायला बसले होते. दरम्यान, त्याचठिकाणी आरोपींपैकी एकाला शुभमने मारहाण केली होती. याचा राग मनात धरुन शुभमला धडा शिकवायची योजना तिघांनी आखली. दारु प्यायल्यानंतर त्यांच्यात वाद झाले आणि यातून त्यांनी बेसिनचं भांडं शुभम साठेच्या डोक्यात घातलं यात गंभीर जखमी होऊन शुभमचा मृत्यू झाला.

दरम्यान, दारूच्या नशेत असलेले आरोपी हे रात्रभर शहरात फिरले. पहाटेच्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात हजर राहून त्यांनी स्वतःच गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चिंचवड पोलिसांनी सुरू केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 4:00 pm

Web Title: the accused of 3 youth murdered his one friend and confessed his crime aau 85 kjp 91
Next Stories
1 VIDEO: १२९ वर्षांचा इतिहास असणारा पुण्याचा हत्ती गणपती
2 पिंपरी-चिंचवडमध्ये थरारक अपघात; भरधाव टँकरने सहा जणांना उडवले
3 राज्यातील धरणांत ७७ टक्के पाणी
Just Now!
X