News Flash

पतंग उडवताना चौथ्या मजल्यावरून खाली पडून ८ वर्षीय मुलाचा मृत्यू

पुण्यातील कोंढवा परिसरात घटना घडली

मृत मुलाचे नाव आतिक शेख आहे.

पतंग उडवण्याच्या नादात तोल जाऊन चौथ्या मजल्यावरून पडून एका आठ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास पुण्यातील कोंढवा परिसरात घडली. मृत मुलाचे नाव आतिक शेख आहे. तो मित्रांसह इमारतीवर पतंग उडवत होता. कोंढवा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील व्हीआयटी कॉलेजच्या मागील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आतिक शेख हा मित्र अरबाज सय्यद, मेहराज यांच्यासह तीन ते चार मुले पतंग उडवत होते. त्याच दरम्यान आतिक शेखचा इमारतीवरून तोल जाऊन तो खाली पडला व त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 5:47 pm

Web Title: the death of an 8 year old boy fell down from the fourth floor while flying a kite
Next Stories
1 कात्रजच्या जुन्या बोगद्याजवळ सुरक्षा रक्षकाचा खून
2 …अन् २०० फूट उंचीच्या वजीर सुळक्यावर फडकला तिरंगा !
3 नवस फेडल्यानंतर काही तासांत काळाचा घाला..
Just Now!
X