एसटी बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशाला आपला दात गमवावा लागल्याची गंभीर घटना समोर आली आहे. भोसरी येथे हा प्रकार घडला असून ज्या प्रवाशाचा दात तुटला आहे त्याने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, भरत सोनू चिखले (वय ५५) असे जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. बस चालकाविरोधात चिखले यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार बस चालक नितीन भास्कर पाटील (वय ४५) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखले हे अमळनेर-पुणे बसने मंचर येथून पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्यांना शेवटून दोन नंबरच्या सीटवर जागा मिळाली आहे. भोसरी उड्डाण पूल ओलांडल्यानंतर भरधाव वेगात असलेली एसटी अचानक गतिरोधकावरून जोरदार उसळी घेऊन आदळली. यामुळे जोरदार झटका बसून बसमधील अनेक प्रवासी काही फूट हवेत उडाले.

nala sopara slab collapse marathi news
नालासोपाऱ्यात गॅलरीचा स्लॅब कोसळला, एक जण जखमी; तीन जणांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

यावेळी एसटीतील स्क्रू निखळलेले एक सीट उडून थेट चिखले यांच्या दातावर आदळले यात त्यांचा एक दात पडला. काही वेळ त्यांच्या तोंडातून रक्तस्त्राव सुरू होता. दरम्यान, या घटनेप्रकरणी चिखले यांनी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र, तिथल्या पोलिस कर्मचाऱ्यांने त्यांना हे प्रकरण आपसांत मिटवून घेण्याचा सल्ला दिला. मात्र, चिखले तक्रारीवर ठाम राहिल्याने पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून घेतला आणि तपास सुरू केला.

एसटीचा प्रवास हा खासगी वाहनांपेक्षा सुरक्षित असतो अशी हमी एसटीकडून दिली जाते, त्यासाठी प्रवाशी विम्याची तरतूदही आहे. त्यामुळे अनेक नागरिक एसटी बसने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. मात्र, बऱ्याचदा एसटी बसेसची अवस्था बिकट असल्याने तसेच चालक भरधाव वेगात बस दामटत असल्याने मोठे अपघात घडले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या या प्रकारांकडे एसटी प्रशासाने गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी नेहमीच्या एसटी प्रवाशांकडून केली जात आहे.