12 November 2019

News Flash

पुणे सातारा रस्त्यावर अपघात; ३ ठार, ५ जखमी

पुणे सातारा रोडवरच्या कोंढणपूर फाट्याजवळ ही घटना घडली

पुणे सातारा रस्त्यावर अपघात झाला आहे. या अपघातात ट्रकने बाईकला ठोकर दिली. ज्यामध्ये तीनजण ठार झाले. तर पाचजण जखमी झाले आहेत. अनिकेत रणदिवे, सुशील कांबळे, सुरेश शिंदे अशी मृत तरुणांची नावं आहेत. तर करण जाधव, राकेश कुऱ्हाडे, अमर कांबळे, चेतन लोखंडे ही जखमींची नावं आहेत. वाढदिवसाचा केक कापून दर्ग्याच्या दिशेने निघाले असताना अपघात झाला. पुणे सातारा रस्त्यावरच्या कोंढणपूर फाट्याजवळ ही घटना घडली. हे सगळेजण पुण्यातल्या तळजई येथील नागरी वस्तीतले रहिवासी होते.

 

सुशील कांबळे या तरुणाचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच हा अपघात झाला. या अपघातात सुशीलचाही मृत्यू झाला. सुशीलच्या वाढदिवसाचा केक कापूनच हे सगळे मित्र दर्ग्याच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने त्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.

First Published on July 23, 2019 8:19 am

Web Title: three youths killed in accident on pune solapur road scj 81