सायबर, आर्थिक गुन्हे रोखणे आव्हान

भाडेकरू नोंदणी पोर्टल कार्यान्वित करणार

भाडेकरू नोंदणी ऑनलाइन पोर्टल तांत्रिक कारणामुळे ठप्प झाल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. ते म्हणाले, या बाबत तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. लवकरच भाडेकरू नोंदणी ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित होईल. नागरिकांच्या हरवलेल्या वस्तू तसेच मोबाइल संच या बाबत तक्रार देण्यासाठी सुरू केलेले लॉस्ट अँड फाऊंड पोर्टल अद्ययावत करण्यात येणार आहे.

‘चमकोगिरी’पेक्षा काम महत्त्वाचे

रस्त्यावर पोलीस दिसल्यास गंभीर स्वरूपाच्या गुन्हय़ांना आळा घालणे शक्य होईल. पोलिसांनी केलेले चांगले काम समाजासमोर येणे गरजेचे आहे. माझा ‘चमकोगिरी’पेक्षा कामावर विश्वास आहे. नोकरदार महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात आलेल्या योजना महत्त्वाच्या आहेत. यापुढील काळात या योजना सुरू राहणार आहेत. नागरिकांच्या विश्वासावर ही कामे पार पाडली जातील. नागरिकांचे हित विचारात घेऊन काम केले जाणार असल्याचे वेंकटेशम यांनी नमूद केले.