लोकमान्य टिळकांच्या कार्य आणि व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणाऱ्या ‘एकमेव लोकमान्य’ या ‘लोकसत्ता’ने तयार केलेल्या विशेषांकाचे प्रकाशन शनिवारी (१ ऑगस्ट) वेब कार्यक्रमाद्वारे होणार आहे. याच कार्यक्रमात लोकमान्यांनी लिहिलेल्या निवडक आणि गाजलेल्या अग्रलेखांचे वाचन मान्यवर कलाकार करणार आहेत.
लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी वर्षांनिमित्त लोकसत्ताने ‘एकमेव लोकमान्य’ हा विशेषांक तयार केला आहे. साहित्य, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील लेखकांनी लोकमान्यांच्या कार्याचा वेध लेखांतून घेतला आहे. त्यामुळे अतिशय वाचनीय आणि संग्राह्य़ असा हा विशेषांक आहे.
विशेषांकाच्या निमित्ताने अग्रलेखांच्या वाचनाचा एक विशेष कार्यक्रमही होणार आहे. लोकमान्यांच्या लेखनातील दूरदृष्टी, भाषासमृद्धी आणि परखड मांडणी यांचा प्रत्यय रसिकांना या कार्यक्रमातून येईल. ज्येष्ठ गायक अभिनेते चंद्रकांत काळे, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लेखक-अभिनेते गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाटय़ निर्माते अजित भुरे आणि लोकमान्यांची व्यक्तिरेखा साकारलेले ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार निवडक अग्रलेखांचे वाचन करणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम चुकवू नये असाच आहे.
* प्रस्तुत : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि.
* सहप्रायोजक : ग्रॅव्हिटस कॉर्प. आणि मे. बी. जी. चितळे डेअरी
* पॉवर्ड बाय : दि टिळक क्रोनिकल आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट
* ऑडिओबुक पार्टनर : स्टोरीटेल अॅप
नोंदणीसाठी..
१ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://tiny.cc/LS_EkmevaLokmanya_1Aug येथे नोंदणी आवश्यक आहे.