News Flash

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या विभागीय अंतिम फेरीत चुरस!

भरत नाटय़मंदिर येथे १३ डिसेंबरला विभागीय अंतिम फेरी

भरत नाटय़मंदिर येथे १३ डिसेंबरला विभागीय अंतिम फेरी

पुणे : ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम फेरीत जाण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्न असल्याने पुणे विभागीय अंतिम फेरी चुरशीची होणार आहे. शुक्रवारी (१३ डिसेंबर) भरत नाटय़ मंदिर येथे सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत ही फेरी रंगणार आहे.

राज्यभरातील महाविद्यालयीन नाटय़कर्मीसाठी ‘लोकसत्ता लोकांकिका’ हा हक्काचा मंच आहे. या स्पर्धेची महाअंतिम फेरी मुंबईत होत असल्याने चित्रपट-नाटय़सृष्टीतील अनेक कलाकार आवर्जून उपस्थित राहतात.

या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरत असल्याने ‘लोकांकिका’च्या अंतिम फेरीत सादरीकरण करणे हे विद्यार्थ्यांसाठी स्वप्न असते. त्यामुळेच महाअंतिम फेरीचे लक्ष्य ठेवून विभागीय अंतिम फेरीत सादर होणाऱ्या एकांकिकांतील विद्यार्थ्यांच्या जोमाने तालमी सुरू आहेत.

प्राथमिक फेरीत सवरेत्कृष्ट ठरलेल्या ‘टिळा’ (फग्र्युसन महाविद्यालय), ‘कन्सेप्ट’ (मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड), ‘ऐनावरम’ (स. प. महाविद्यालय),  ‘कुणीतरी पहिलं हवं’ (बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय) आणि ‘टॅन्जंट’ (काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय) या एकांकिका विभागीय अंतिम फेरीत सादर होणार आहेत. वैविध्यपूर्ण आशयविषय, प्रयोगशील मांडणी हे या एकांकिकांचे वैशिष्टय़ आहे. स्पर्धेच्या पुणे विभागीय अंतिम फेरीत महाविद्यालयीन रंगकर्मीनी साकारलेल्या एकांकिका पाहण्यासाठी पुणेकर नाटय़प्रेमींना निशुल्क आणि मुक्त प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना प्रेक्षकांना दाद देता येईल.

अनुभवी कलावंतांशी ‘खडा संवाद’

पुणे विभागीय अंतिम फेरीत यंदा पहिल्यांदाच ‘खडा संवाद’ हा अनोखा प्रयोग करण्यात येणार आहे. स्पर्धेदरम्यान चित्रपट-नाटय़ क्षेत्रातील अनुभवी कलावंत गिरीश कुलकर्णी, किरण यज्ञोपवित आणि प्रवीण तरडे यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे उपस्थित प्रेक्षक आणि विद्यार्थ्यांना या तिन्ही कलावंतांकडून लेखन-दिग्दर्शन, निर्मितीची प्रक्रिया या क्षेत्रातील आजवरचे अनुभव ऐकण्याची संधी मिळेल.

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. ‘झी टॉकीज’ या उपक्रमासाठी प्रक्षेपण भागीदार देखील आहे. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 3:04 am

Web Title: tough competition in divisional final round of loksatta lokankika zws 70
Next Stories
1 योजनांचा नुसताच गवगवा
2 दुप्पट टीडीआर किंवा चार एफएसआय
3 मागणीअभावी लिंबाच्या दरात मोठी घट
Just Now!
X