अविनाश कवठेकर, लोकसत्ता

नगरसेवक

योगेश ससाणे

वैशाली बनकर

उज्ज्वला जंगले

मारुती तुपे.

प्रभाग – हडपसर गावठाण-सातववाडी

प्रभाग क्रमांक- २३

पुणे : वाहतुकीची कोंडी, अपुरा आणि विस्कळीत पाणीपुरवठा अशा समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या महापालिके च्या हडपसर गावठाण-सातववाडी या प्रभाग क्रमांक २३ मध्ये एकही वाहनतळ नाही. सर्वाधिक वाहतूक असलेल्या या प्रभागात वाहनतळांचा अभाव हीच मोठी समस्या आहे. वाहनतळासाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे रस्त्यावरच गाडय़ा लावण्याचे प्रकार होत आहेत. वाहनतळाबरोबरच या प्रभागात महापालिके च्या मालकीचे एकही रुग्णालय नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी अन्य प्रभागातील दवाखाना किं वा रुग्णालयात धाव घ्यावी लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. पाणीपुरवठय़ाचे प्रश्नही नगरसेवकांना चार वर्षांत मार्गी लावता आले नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

चार ते पाच मोठय़ा झोपडपट्टय़ांचा समावेश असलेल्या हडपसर गावठाण-सातववाडी प्रभागात मध्यमवर्गीय मोठय़ा प्रमाणावर आहेत. राज्याच्या अन्य भागातून अनेक नागरिक येथे कामानिमित्त येऊन स्थायिक झाले आहेत. प्रभागात योगेश ससाणे आणि वैशाली बनकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असून उज्ज्वला जंगले आणि मारुती तुपे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहेत. सांडपाणी वाहिन्यांची अर्धवट कामे, अपुरा पाणीपुरवठा अशा समस्या या प्रभागात दिसून येतात. वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत नगरसेवकांना ठोस उपाययोजना राबविता आलेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

पुणे-सोलापूर महामार्ग या प्रभागातून जातो. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बीआरटी मार्ग येथे प्रस्तावित करण्यात आला. मात्र तो नावालाच राहिला आहे. बीआरटी मार्गामुळे होत असलेले लहान-मोठे अपघात आणि बीआरटी मार्गामुळेच वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप करीत बीआरटी मार्गाची हव्या त्या पद्धतीने तोडफोड करण्यात आली. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या बीआरटी मार्गामुळे अन्य वाहनांसाठी रस्ता अपुरा ठरत आहे. त्यामुळे बीआरटी मार्गातूनच वाहने दामटली जात आहेत. मध्यभागी बीआरटी मार्ग, सेवा रस्त्यांसाठी आवश्यक जागा नसल्यामुळे रस्ता रुंदीकरणही रखडले आहे.  या प्रभागात एकही वाहनतळ नसल्याची वस्तुस्थिती आहे. वाहनतळ नसल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी, दुचाकी गाडय़ा लावल्या जातात. त्यातून वाहतूक कोंडीत भर पडते. दरम्यान, वाहनतळांच्या उभारणीसाठी प्रभागात मोठय़ा जागा नसल्याचा दावा नगरसेवकांकडून करण्यात येतो.

वाहनतळाबरोबरच महापालिके चे रुग्णालय किं वा दवाखाना प्रभागात नाही. त्यामुळे खासगी मोठय़ा रुग्णालयात उपाचारासाठी जावे लागते किं वा अन्य प्रभागातील महापालिके च्या दवाखान्यांत जावे लागते, अशी नागरिकांची तक्रार आहे. रस्त्यांवर, पदपथांवर अतिक्रमणे झाली असून पदपथ विक्रे त्यांनी व्यापले आहे. पाणीप्रश्नही गंभीर असून अनेक भागांना वर्षांतील सात ते आठ महिने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. अपुरा, विस्कळीत पाणीपुरवठय़ामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. पाणीप्रश्नही नगरसेवकांना सोडविता आलेला नाही. शेजारील प्रभागातील कचरा प्रकल्पांमुळे दरुगधीचा त्रास सहन करावा लागत असल्याच्याही नागरिकांच्या तक्रारी आहेत.

नगरसेवकांचे दावे

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना

जलवाहिन्यांची कामे प्रगतिपथावर

सांडपाणी वाहिन्यांच्या कामांना प्राधान्य

भाजी मंडई, उद्यानांचे विकसन

अंतर्गत रस्त्यांची कामे

नागरिक म्हणतात

उड्डाण पूल असूनही सातत्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. सिग्नल असले तरी वाहनचालकांना प्रत्येक सिग्नल दोन ते तीन वेळा लागतो, यातूनच वाहतूक समस्या किती गंभीर आहे, हे दिसून येते. रिक्षा थांबे, अवैध प्रवासी वाहतुकीचाही मोठा प्रश्न आहे. पाणी समस्याही कामय असून रस्त्याच्या दुतर्फा गाडय़ा लावल्या जातात.

– नीलेश कदम, गाडीतळ

सांडपाणी वाहिन्या सातत्याने फु टतात किं वा तुंबलेल्या असतात. कामांसाठी रस्ते खोदले जातात त्यानंतर कामे अर्धवट ठेवली जातात. पायाभूत सुविधाही नाहीत. प्रशस्त पदपथ नसल्यामुळे नागरिकांना चालताना अडथळा निर्माण होतो. दैनंदिन साफसफाईची कामेही नीट होत नाहीत. अनेक वेळा कमी दाबाने पाणीपुरवठा होतो.

– उमेश जाधव, हडपसर

राजकीय प्रतिनिधी म्हणतात

प्रभागातील सांडपाणी वाहिन्या, जलवाहिन्यांची कामे अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाली आहेत. पाण्याची समस्याही सुटू शकलेली नाही. अनधिकृत रिक्षा थांब्यांमुळे रस्त्यांवर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. त्यावर ठोस उपाययोजना होत नाहीत. बीआरटी प्रकल्प राहिलेला नसून बीआरटी मार्गात हव्या त्या पद्धतीने दुभाजक लावण्यात आले आहेत.

– विजय देशमुख, शिवसेना</strong>

वाहतुकीची समस्या सर्वाधिक आहे. प्रभागात कोणतेही नव्या योजना राबविण्यात आलेल्या नाहीत. झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न नगरसेवकांना योग्य पद्धतीने हाताळता न आल्यामुळे डी-मार्टकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाचे काम कागदावरच राहिले आहे. तर एक उड्डाण पूल एका मोठय़ा गृहसंकु ल प्रकल्पासाठी नियोजित करण्यात आला आहे. नागरिक के ंद्रबिंदू ठेवून उपाययोजना के ल्या जात नाहीत.

–  चंद्रकांत मगर, काँग्रेस</strong>

प्रभागातील समस्यांचा लेखाजोखा

महापालिके च्या गेल्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी नागरिकांना भरघोस आश्वासने दिली होती. या आश्वासनांचे काय झाले, कोणती कामे झाली, कोणत्या योजना प्रत्यक्षात आल्या याचा आढावा ‘प्रभागाचे प्रगतिपुस्तक’ या वृत्तमालिके तून दररोज घेतला जात आहे.

प्रभागांमधील नागरिकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्रभागाचे नगरसेवक काय करत आहेत, गेल्या साडेतीन वर्षांत कोणत्या समस्या सुटल्या, कोणती कामे रखडली, कोणती कामे झाली याची सविस्तर माहिती या वृत्तमालिके तून देण्यात येत आहे. वृत्तमालिका सुरू झाल्यानंतर नागरिकांकडून त्याला प्रतिसाद मिळत असून विविध प्रभागातील नागरिकांनी त्यांना दैनंदिन भेडसाविणाऱ्या समस्या कळविल्या आहेत. यातील काही निवडक समस्यांची माहिती या सदरातून प्रसिद्ध के ली जात आहे.

नागरिकांनी आपल्या भागातील समस्या, प्रश्न पुढील ई-मेल पत्यावर पाठवावेत. समस्यांचे छायाचित्रही पाठविता येईल. आपले नाव आणि संपर्क क्रमांकही अवश्य द्यावा.

इ-मेल- lokpune4@gmail.com

लोकप्रतिनिधी म्हणतात

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बीआरटी मार्ग काढून टाकला आहे. जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्यांची कामे करण्यात आली आहेत. ससाणेनगर परिसरात शहीद सौरभ

फराटे उद्यान निर्मिती होणार आहे. भाजी मंडईचे कामही सुरू झाले आहे. वाहनतळासाठी मंत्री मार्के ट आणि लोहियानगर उद्यानातील ओढय़ावर वाहनतळ उभारण्याचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. विरोधी पक्षामुळे विकासकामांसाठी अपुरा निधी मिळतो आहे.

– योगेश ससाणे, नगरसेवक

वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने पाठपुरावा सुरू आहे. रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. सिग्नल बसविण्याबरोबरच उड्डाण पुलांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. गोंधळेनगर परिसरात सुसज्ज दवाखाना उभारण्याचे नियोजित आहे. जलवाहिन्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. वाहनतळाचा प्रश्न सोडविण्यासाठी काही जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीच्या कामांना प्राधान्य आहे.

– वैशाली बनकर, नगरसेविका

जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने ८० टक्के  पूर्ण झाली आहेत. ई-लर्निग स्कू ल आणि अग्निशमन के ंद्राचे काम सुरू आहे. दवाखानाही प्रस्तावित करण्यात आला असून जुन्या कालव्यावर पूल बांधण्यात येणार आहे. ससाणेनगर-वैदूवाडी आणि ससाणेनगर-काळेपडळ या भागात भुयारी मार्गाची उभारणी होत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाण पूल प्रस्तावित असून त्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.

– मारुती तुपे, नगरसेवक

तक्रारींचा पाढा

जागोजागी अनधिकृत रिक्षा थांबे

सेवा रस्त्यांचा अभाव

कचरा प्रकल्पांमुळे अनारोग्याचा धोका

वाहतूक कोंडी नित्याची

सांडपाणी वाहिन्यांची अर्धवट कामे

प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे

हडपसर, हडपसर गावठाण, ससाणेनगर, सातववाडी, गोंधळेनगर, काळेपडळ, सय्यदनगरचा काही भाग, गाडीतळ, उन्नतीनगर, पांढरेमळा वस्ती, साईनाथ वसाहत, तुळजाभवानी वसाहत, महात्मा फु ले वसाहत, प्रसादनगर, त्रिवेणीनगर, काळेबोराटेनगर, मगर आळी, भाजी मंडई परिसर.