वाहतूक व्यवस्थापन, नियोजनासाठी कवायत उपयुक्त

पुणे : शहरातील प्रमुख चौकात सिग्नलला थांबणाऱ्या वाहतूक पोलिसांना खास प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणा हाताळणाऱ्या पोलिसांना कवायतीद्वारे प्रशिक्षण देण्यात येत असून त्यामुळे वाहतूक पोलिसांची तंदुरुस्ती तसेच कौशल्य वाढण्यास मदत होणार आहे.

bmc swimming pool marathi news
मुंबई महानगरपालिकेचे दहा तरण तलाव प्रशिक्षणासाठी खुले; २४ एप्रिलपासून ऑनलाईन नावनोंदणी, प्रशिक्षण कालावधी २१ दिवसांचा
ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती

पुणे शहरातील प्रमुख चौकातील वाहतुकीचे नियमन करणाऱ्या ६५९ पोलिसांना आतापर्यंत सिग्नल पीटी प्रशिक्षण देण्यात आले आहे. यापुढील काळात वाहतूक शाखेतील उर्वरित पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिली.

पंधरवडय़ापासून पोलिसांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दररोज सकाळी दोन तास शिवाजीनगर येथील पोलीस कवायत मैदानावर पोलिसांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित केला जात आहे. तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. वाहतूक शाखेतील रस्ते सुरक्षा विभागाचे (आरएसपी) पोलीस निरीक्षक पी. डी. मासाळकर आणि कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण वर्गाचे संयोजन केले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी प्रमुख चौक तसेच रस्त्यांवरून मोठय़ा संख्येने वाहनांची ये-जा सुरू असते. अनेक वाहनचालक नियम धुडकावतात. बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत भर पडते.

प्रशिक्षणाचा फायदा काय?

या प्रशिक्षणामुळे वाहतूक पोलिसांची वाहतूक नियमनाची क्षमता वाढणार आहे. वाहतुकीचे व्यवस्थापन, नियोजन, वाहतूक कोंडी सोडविण्याचे वाहतूक पोलिसांचे कौशल्य वाढेल, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिली.