News Flash

सुपारी घेऊन खून करणाऱ्या दोघे चौकशीसाठी गोव्यातून ताब्यात

विद्यापीठ रखवालदाराच्या खुनातील आरोपी मनीष नागोरी याने दिलेल्या माहितीवरून पुणे पोलिसांनी सुपारी घेऊन खून करणाऱ्या दोघांना गोव्यातून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या

| December 7, 2013 02:37 am

विद्यापीठ रखवालदाराच्या खुनातील आरोपी मनीष नागोरी याने दिलेल्या माहितीवरून पुणे पोलिसांनी सुपारी घेऊन खून करणाऱ्या दोघांना गोव्यातून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाबाबत चौकशी करण्यात येत आहे.
पुणे विद्यापीठातील सुरक्षारक्षक प्रल्हाद जोगदंडकर आणि डॉ. दाभोलकर यांच्या खूनामध्ये मारेकऱ्यांनी एकाच प्रकारचे पिस्तुल वारले आहे. विद्यापीठ खून प्रकरणी पोलिसांनी नागोरीसह चौघांना अटक केली आहे. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. नागोरीने ४७ जणांस शस्त्रास्त्र पुरविल्याचे समोर आले आहे. त्यानेच डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना शस्त्र पुरविल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोव्यातून दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे डॉ. दाभोलकर खून प्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. त्याच बरोबर सातारा येथील एका युवकाकडे ही तपास सुरू आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2013 2:37 am

Web Title: two contract killer custody in goa for inquiry
Next Stories
1 पालिकेच्या इंद्रधनुष्य केंद्रातर्फे पर्यावरण महोत्सवाचे आयोजन
2 ताथवडय़ातील फेरबदलामुळे ६०० घरे वाचली
3 भरधाव मोटारीने ठोकर दिल्याने अडीच वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Just Now!
X