News Flash

व्यावसायिकाच्या पत्नीला ५ लाखांची खंडणी मागणारे दोन इंजिनिअर तरुण अटकेत

यापैकी एक तरूण या महिलेला ओळखत होता, या दोघांनी फेसबुकवरून या महिलेची माहिती काढली होती असेही समजते आहे

श्रीमंत व्यावसायिकाच्या पत्नीला ५ लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन इंजिनिअर तरुणांना वाकड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. रोहित यादव आणि अभिनव मिश्रा अशी या दोघांची नावं आहेत. दिल्लीहून खंडणी घेण्यासाठी हे दोघे शुक्रवारी विमानाने पुण्यात दाखल झाले होते. त्यावेळी वेगवेगळ्या वेशात असलेल्या पोलिसांनी त्यांना अटक केली. पिंपरी-चिंचवड शहरातील व्यावसायिकाच्या पत्नीला ५ लाख रुपयांच्या खंडणीचा फोन १९ तारखेला आला होता.पैसे दिले नाहीत तर मुलीचे अपहरण करू अशी धमकी उच्चशिक्षित आरोपीने दिली होती.त्यामुळे घरातील सर्वच घाबरले होते.संबंधित महिलेने तातडीने वाकड पोलीस ठाणे गाठत अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला.त्यानुसार वाकड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

रोहित यादव (वय-२८ रा.नवी दिल्ली) आणि अभिनव मिश्रा (वय-२७ रा.लखनऊ) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी रोहित हा पूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात शिक्षण घेण्यास असल्याने तो खंडणी मागितलेल्या महिलेला ओळखत होता. तो त्यांच्याच वसाहतीत राहायला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.तसेच दोन्ही आरोपीनि अधिकची माहिती मिळवण्यासाठी फेसबुकचा वापर केला.त्याप्रमाणे ते योजना आखत होते.आरोपी हे उच्चशिक्षित असल्याने महिलेला खंडणीचा फोन करताना पब्लिकबूथ चा वापर करत होते.त्यामुळे पोलिसांच्या तपासात अनेक अडचणी येत होत्या.

अखेर आरोपीना पुण्यात पाच लाखाची खंडणी घेण्यासाठी बोलवण्यात पोलिसांना यश आले.आरोपीने अगोदर पुण्याच्या लोहगाव विमानतळावर महिलेला पैसे घेऊन बोलावले.मात्र पोलिसांना जागा योग्य न वाटल्याने त्यांना वाकड परिसरात बोलवण्यास महिलेला सांगितले.त्याप्रमाणे वाकड पोलिसांनी कंबर कसत तब्बल ६ अधिकारी आणि ४० कर्मचारी सापळा रचून होते यात काही पोलीस कर्मचारी डॉक्टर, फळविक्रेता,भाजी विक्रेता यांच्या वेशात उभे होते.त्याप्रमाणे सापळा रचला आणि अनोळखी दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनीच खंडणीसाठी आल्याने सांगितले. ज्यानंतर वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2018 6:26 pm

Web Title: two engineers arrested for a ransom of rs 5 lakh for the wife of a businessman in pimpri
Next Stories
1 ‘डीजे’ बंदी असेल तर तर विसर्जन होणार नाही, गणेशोत्सव मंडळांचा इशारा
2 पुण्याहून मुंबईला जाणारा मालवाहू ट्रक पुलावरून कोसळला
3 पोलिसांकडून ‘डीजें’वर कारवाई सुरू; थेट ध्वनिवर्धक यंत्रणा जप्त!
Just Now!
X