26 October 2020

News Flash

पुण्यात दोन चिमुरडींवर ज्येष्ठ नागरिकाकडून लैंगिक अत्याचार

घरात कोणी नसल्याचे पाहून त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या राहणार्‍या ६० वर्षांच्या नराधमाने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला.

पुण्यात एका ६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाकडून दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. कोथरूड भागातील सुतारदरा येथे ही घटना घडली. कोथरूड पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुली सुतारदरा भागातील एका गरीब कुटुंबातील आहेत. या मुलींचे आई-वडील कामासाठी बाहेर जाताना आपल्या साडे तीन आणि साडे चार वर्षांच्या दोन्ही मुलींना घरीच ठेऊन गेले होते.

घरात कोणी नसल्याचे पाहून त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या राहणार्‍या ६० वर्षांच्या नराधमाने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. घडलेला हा सर्व प्रकार या मुलींच्या आत्याच्या ५ वर्षांच्या मुलाने पहिला. मामा-मामी घरी आल्यानंतर त्याने ही बाब त्यांना सांगितली.

या घटनेबाबत पीडित मुलींच्या पालकांनी ६० वर्षीय आरोपी ज्येष्ठ नागरिकाला जाब विचारल्यानंतर त्याने तिथून पळ काढला. या प्रकारानंतर पीडित मुलींच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली असून याप्रकरणी संबंधीत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2019 2:52 pm

Web Title: two little girlss sexual harassment by senior citizen in pune
Next Stories
1 पुण्यात एसटीच्या शिवशाहीसह ६ खासगी बस जळून खाक
2 पार्थ पवारांच्या सभेमध्ये राष्ट्रवादीसह मनसेचे झेंडे!
3 झाकाझाकीसाठी धावाधाव!
Just Now!
X