News Flash

निगडीत दोन महिन्यांच्या मुलीचा इमारतीवरून पडून गूढ मृत्यू

निगडीमध्ये अवघ्या दोन महिन्यांची मुलगी सोमवारी सकाळी इमारतीच्या दुसऱया मजल्यावरून पडून मृत्युमुखी पडली.

| June 1, 2015 02:20 am

निगडीमध्ये अवघ्या दोन महिन्यांची मुलगी सोमवारी सकाळी इमारतीच्या दुसऱया मजल्यावरून पडून मृत्युमुखी पडली. रांगताही येत नसलेली ही मुलगी दुसऱया मजल्यावरून कशी काय पडली, हे अद्याप गूढ असून, पोलीसांनी यामध्ये घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
मैत्री विजय पाटेकर असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. तिची आई सुषमा विजय पाटेकर सध्या बाळंतपणासाठी तिच्या माहेरी निगडी ओटा स्कीम पुनर्वसन प्रकल्पातील घरामध्ये राहात आहे. सोमवारी सकाळी सहा वाजता मैत्री इमारतीच्या दुसऱया मजल्यावरून खाली पडली. ती खाली पडल्याची माहिती घरातील कोणालाच नव्हती, असे तिच्या कुटुंबियांनी पोलीसांनी सांगितले. शेजारच्या नातेवाईकांनी पाटेकर कुटुंबियांना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर तिला यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे सकाळी साडेदहा वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2015 2:20 am

Web Title: two months baby dead in nigdi
Next Stories
1 – ‘एनडीए’च्या १२८व्या तुकडीचे शानदार दीक्षान्त संचलन
2 नदीपात्रात पुन्हा राडारोडा; वंदना चव्हाण यांचे आंदोलन
3 श्रीलंकेजवळच मान्सून रेंगाळला..
Just Now!
X