News Flash

पुण्यात बांधकामाचा पाळणा तुटून दोघांचा मृत्यू

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते

(संग्रहित छायाचित्र)

पुण्यातील कोथरुडमध्ये एका इमारतीच्या लिफ्टचे काम सुरु असताना पाळणा कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला. मुशीर बुराह रहमान (वय २४) असे एका मृत कामगाराचे नाव आहे तर दुसऱ्या कामगाराचे नाव समजू शकलेले नाही. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महात्मा सोसायटीच्या पुढील बाजूस असलेल्या २० मजली इमारतीच्या लिफ्टचं काम सुरु होतं. त्यावेळी मुशीर रहमान आणि त्याच्यासोबतचा एक जण हे काम करत होते. त्याचवेळी पाळणा तुटला आणि हे दोघे यामध्ये जखमी झाले. या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या दोघांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.

कोथरुडमधील महात्मा सोसायटीच्या शेवटच्या टोकाला डोंगराच्या बाजूला एका २० मजली इमारतीचे बांधकाम सुर आहे. या इमारतीचे काम जवळपास पूर्ण झाले असून इमारतीला रंग देण्याचं काम सुरु आहे. त्यासाठी इमारतीच्या कडेने पाळणा बांधला होता. त्यावर उभं राहून दोन कामगार काम करत होते. तेव्हाच या पाळणा कोसळला आणि या दोघांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाला या संदर्भातली माहिती मिळताच ते जवान या ठिकाणी पोहचले. या दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं मात्र त्या दोघांचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 2:43 pm

Web Title: two workers collapsed and dead in pune scj 81
Next Stories
1 मुंबईसह राज्यात जोरदार पावसाचा अंदाज
2 धोक्याची घंटा
3 वाहनचालकांना वाहतूक पोलिसांची दिवाळी भेट!
Just Now!
X