करोनाचा प्रादुर्भाव, ऑनलाइन परीक्षेसाठी कंपनीची नेमणूकही रखडली

पुणे : सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाने ऑनलाइन पद्धतीने सत्र परीक्षा घेण्याचे जाहीर के ले होते. मात्र ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी खासगी कं पनीची नेमणूक रखडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कं पनीची नेमणूक, करोनाचा प्रादुर्भाव या सगळ्यामुळे परीक्षा लांबण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाने अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी कं पनीची नेमणूक के ली होती. त्या वेळी एक वर्षासाठी करार करण्यात आला होता. अंतिम वर्ष परीक्षेनंतर श्रेणीसुधार आणि विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे कामही त्याच कं पनीकडून करून घेण्यात आले. आता विद्यापीठाकडून सत्र परीक्षांचे नियोजन करताना ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा विचार सुरू होता. मात्र शैक्षणिक वर्षाला झालेला उशीर, शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने झाल्याने परीक्षाही ऑनलाइन पद्धतीनेच घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी विचारात घेऊन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र ही परीक्षा प्रॉक्टर्ड पद्धतीने व बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांसह दीर्घोत्तरी प्रश्नांचाही समावेश प्रश्नपत्रिके त करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रथम वर्षाची परीक्षा ३० मार्चपासून आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा २० मार्चपासून घेण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज खुले करण्यात आले.  आधीच्या कं पनीचा करार एक वर्षासाठी असतानाही सत्र परीक्षेसाठी पुन्हा नवीन कं पनी नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे नव्या कं पनीची नेमणूक, निवडलेल्या कंपनीला परीक्षा प्रक्रिया, व्यवस्थेशी जुळवून घेण्यास काही वेळ लागू शकतो.

दोन्ही सत्रांच्या एकत्रच परीक्षा घेण्याची मागणी

शैक्षणिक वेळापत्रक पूर्ववत होण्यासाठी विद्यापीठाने प्रथम आणि द्वितीय सत्राची परीक्षा एकत्रच घेण्याची मागणी अधिसभा सदस्य डॉ. पंकज मिणियार यांनी कु लगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे के ली आहे. विद्यापीठाच्या नियोजनानुसार जवळपास दीड महिना ही परीक्षा चालणार आहे. त्यामुळे द्वितीय सत्र आणखी लांबणीवर पडून द्वितीय सत्र सुरू होण्यासाठी मे उजाडणार आहे. पण विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३१ मे रोजी शैक्षणिक वर्ष संपणार आहे. उन्हाळी सुटीनंतर द्वितीय सत्राचे कामकाज पूर्ण करून दिवाळीपर्यंत द्वितीय सत्राचे काम संपेल. त्यामुळे विद्यापीठाने प्रथम सत्र परीक्षेसाठी दीड महिना देण्यापेक्षा त्वरित द्वितीय सत्राचे वर्ग घेऊन एकत्रित दोन्ही सत्रांची परीक्षा घ्यावी. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होऊ शके ल, असे डॉ. मिणियार यांनी निवेदनात स्पष्ट के ले आहे. त्यांनी हीच मागणी जानेवारीत झालेल्या अधिसभेतही के ली होती.

सत्र परीक्षेच्या संभाव्य तारखा या पूर्वीच जाहीर के लेल्या आहेत. कं पनी नेमणुकीची प्रक्रिया हा अंतर्गत भाग आहे. करोना प्रादुर्भावाचा परिणाम परीक्षा लांबण्यावर काही प्रमाणात होऊ शकतो. – डॉ. एन. एस. उमराणी, प्र कु लगुरू, सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ