05 August 2020

News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये टोळक्याचा हैदोस; रॉडने १८ वाहनांची केली तोडफोड

पोलिसांत गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. शहरातील संजय गांधी नगरमध्येही तोडफोडीची घटना समोर आली आहे. अज्ञात टोळक्याने १८ वाहनांची तोडफोड करून सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान केले आहे. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्र घेऊन आलेल्या समाजकंटकांनी वाहनांचं नुकसान केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संजय गांधी नगर येथे अज्ञात सात ते आठ जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली आहे. ही घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. हातात लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रे घेऊन दहशत पसरविण्याच्या उद्देशाने ही तोडफोड करण्यात आल्याचे पिंपरी पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेत दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकीसह इतर वाहनांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, या घटने प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 11:36 am

Web Title: unknown people attacked on vehicles in pimpri chinchwad bmh 90
Next Stories
1 प्लास्टिकची अंडी ही निव्वळ अफवा
2 वादग्रस्त पुस्तकाच्या निषेधार्थ ‘राष्ट्रवादी’चे आंदोलन
3 हिंजवडी मेट्रोसाठी आवश्यक शासकीय जागेचे हस्तांतरण लवकरच
Just Now!
X