कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा १६ स्वतंत्र केंद्रांवर

पुणे : शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांच्या बुधवारच्या लसीकरणासाठी महापालिके ने एकूण ७२ केंद्र निश्चित के ली आहेत. यापैकी ५६ केंद्रांवर कोविशिल्ड लशीची मात्रा दिली जाणार आहे. तर कोव्हॅक्सिन लशीसाठी १६ केंद्रांवर याच लशीची के वळ दुसरी मात्रा दिली जाणार आहे, अशी माहिती महापालिके च्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

कोविशिल्ड लशीसाठी ५६ केंद्रांमध्ये पहिली मात्रा दिली जाणार आहे. त्यासाठी के ंद्रांना प्रत्येकी १०० मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उपलब्ध लशींच्या एकू ण साठय़ापैकी ६० टक्के  लस ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी के लेल्या नागरिकांना दिली जाणार आहे. २० टक्के लशीच्या मात्रा थेट के ंद्रांवर येऊन नावनोंदणी करणाऱ्या नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून पहिली मात्रा ८४ दिवसांपूर्वी घेतलेल्या (१७ मार्च) नागरिकांना २० टक्के  लस दिली जाणार आहे. अपंग, स्तनदा माता, आघाडीचे कर्मचारी यांना थेट नोंदणी के ल्यानंतरही पहिली मात्र दिली जाणार आहे. नागरिकांना ऑनलाइन नोंदणी बुधवारी सकाळी आठ वाजता करता येणार आहे. कोव्हॅक्सिनसाठी १६ केंद्रांवर के वळ दुसरी मात्रा दिली जाणार आहे. यातील कोणत्याही के ंद्रावर पहिली मात्रा दिली जाणार नाही, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.