News Flash

दक्षिण पुण्यात आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार !

पुणे महापालिका प्रशासनाचा कात्रज कोंढवा भागासाठी महत्वपूर्ण निर्णय

झोन नुसार पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (संग्रहीत छायाचित्र)

पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणात पावसाने मागील काही दिवसात विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शहरासमोर येत्या काळात पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र त्याच दरम्यान राजीव गांधी पंपींग स्टेशनद्वारे पाणीपुरवठा होणार्‍या केदारेश्वर आणि महादेवनगर टाकीवर अवलंबून असणार्‍या कात्रज, कोंढवा तसेच बिबवेवाडीचा काही भाग म्हणजेच दक्षिण पुण्याला आठवडयातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १९ जुलै सोमवारपासून केली जाणार आहे. तसेच या परिसराचे सात झोन करण्यात आले आहे. हे लक्षात घेता, झोन नुसार पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यासाठी दिवस देखील निश्‍चित करण्यात आले आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या प्रशासना मार्फत देण्यात आली आहे.

महादेवनगर टाकीवरून पुरवठा होणारा भाग या दिवशी असणार पाणी बंद –

सोमवार : कात्रज गाव (संपूर्ण), सातारा रोड (मस्ताना हॉटेल)
मंगळवार – राजस सोसायटी, कमला सिटी, इंद्रास्थ सोसायटी, भुषण सोसायटी, निरंजन सोसायटी, बलकवडेनगर, स्टेट बॅंक नगर
बुधवार – सुखसागरनगर भाग- 1 (संपूर्ण)
गुरूवार – शिवशंभोनगर (डोंगरचा भाग), महादेवनगर, स्वामीसमर्थ नगर विघ्नहर्तानगर, शिवशंभोनगर (रस्त्याचा भाग), महावीरनगर
शुक्रवार – वाघजाईनगर, प्रेरणा हॉस्पिटल परिसर, भाडेआळी, गुलाबशहानगर
शनिवार – उत्कर्ष सोसायटी, शेलारमळा, माऊलीनगर, वरखडेनगर, जाधवनगर 1 व 2 , पोलीस कॉलनी, साई इंडस्ट्रिज
रविवार – भारतनगर, दत्तनगर, जोगेश्वरीनगर, मोरे वस्ती, निवाळकर वस्टी. खामकर वस्ती

केदारेश्‍वर टाकीवरून पुरवठा होणारा भाग या दिवशी पाणी असणार बंद –

सोमवार – साईनगर, गजानन महाराजनगर, शांतीनगर सोसायटी, महानंद सोसायटी, श्रीकृष्ण कॉलनी, सावंत सोसायटी
मंगळवार : टिळेकरनगर, कामठे पाटीलनगर, खडीमशीन चौक, सिंहगड कॉलेज, आकृती सोसायटी, कोलते पाटील सोसायटी, सिंहगड कॉलेज
बुधवार – सुखसागरनगर भाग- (संपूर्ण)
गुरुवार : शिवशंभोनगर, विद्यानगर, आनंदनगर, सुंदरनगर, अशरफनगर, सावकाशनगर, शिवशंभोनगर (काकडे वस्ती), काकडेवस्ती (उर्वरित), गोकुळनगर (रस्त्याचा भाग) गोकुळनगर (डोंगरचा भाग), वृंदावननगर
शुक्रवार : कोंढवा बु।।( गावठाण), वटेश्वर मंदिर, भोलेनाथ फर्निचर, हिलव्ह्यु, सोसायटी, मरळनगर, कांतीनी अपार्टमेंट, विष्णू ठोसरनगर, कोढवा बु।।, (भाऊ कामठे गल्ली), लक्ष्मीनगर (संपूर्ण)
शनिवार – राजीवगांधीनगर (संपूर्ण), चैत्रबन वसाहत, कृष्णानगर झांबरे वस्ती, अण्णाभाऊ साठेनगर, ग्रीन पार्क अजमेरा पार्क, काकडेवस्ती,गल्ली क्र.1
रविवार – शिवप्लाझा सोसायटी, पिसोळी रोड, H&M सोसायटी, पारगेनगर, 15 नंबर, आंबेडकरनगर, (संपूर्ण), पुण्यधाम आश्रमरोड, हगवणे वस्ती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 8:46 pm

Web Title: water supply to south pune will be closed one day a week msr 87 svk 88
Next Stories
1 राजेश साप्ते आत्महत्या प्रकरण : मुख्य आरोपी राकेश मौर्या याला अटक!
2 “आपली सूत्रं येरवडा जेलमधून हालतात”, म्हणणाऱ्या यम भाईला पुणे पोलिसांचा हिसका; हात जोडून मागितली माफी
3 सूर्यामधून तोफगोळासदृश उत्सर्जनाचा पल्सारच्या साहाय्याने उलगडा