28 February 2021

News Flash

सीरम इन्स्टिट्यूटकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाखांची मदत

सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना सीरम इन्स्टिट्यूटकडून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मृतांपैकी दोन जण पुण्यातील असून अन्य दोन जण उत्तर प्रदेश व एकजण बिहारमधील आहे. हे सर्वजण कंत्राटी मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.

“आज SII साठी अत्यंत दु:खद दिवस आहे. आम्हाला अतिशय दुःख झाले आहे आणि मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. नियमानुसार या कुटंबांनी जी मदत मिळायची आहे ती मिळेलच, मात्र त्या व्यतिरिक्त आम्ही प्रत्येक कुटुंबास २५ लाखांची मदत देत आहोत.” असं सायरस पुनावाला यांनी जाहीर केलं आहे.

सीरम इन्स्टिट्यूटमधील अग्नितांडवात, प्रतिक पाष्टे – डेक्कन पुणे, महेंद्र इंगळे – पुणे, रमाशंकर हरिजन – उत्तर प्रदेश, बिपीन सरोज – उत्तर प्रदेश, सुशीलकुमार पांडे – बिहार या पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

आग लागलेल्या ठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन किंवा साठवणूक होत नव्हती. पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी हे काम सुरु होतं. पण दुर्दैवाने पाच जणांना जीव गमवावा लागला असल्याचं, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.

“सुरुवातीला चार लोक अडकल्याची माहिती मिळाली होती. पुणे महापालिका आणि अग्निशमन दलाने त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. आग १०० टक्के विझल्यानंतर आपली लोकं शेवटच्या मजल्यावर पोहोचली तेव्हा मजला खाक झाला होता आणि पाच जणांचे मृतदेह पडले होते. पाचही जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला,” असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 10:10 pm

Web Title: we will be offering compensation of rs 25 lakhs to each family in addition to mandated amount as per the norms cyrus poonawalla msr 87
Next Stories
1 Serum Institute Fire : आग नक्की कशामुळे लागली हे अद्याप कुणीही सांगू शकत नाही – उपमुख्यमंत्री
2 “मी तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून जीव वाचवला, पण भाऊ खाली आलाच नाही”
3 Serum Institute Fire : ‘कोव्हिशिल्ड’ सुरक्षितच… अदर पूनावाला यांनी बनवलेला बॅकअप प्लॅन कामी आला
Just Now!
X