News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये लिफ्ट यंत्रणेतील बिघाडामुळे वृद्ध महिलेने गमावला जीव

पिंपळे सौदागर येथील घटना

नीलिमा यांची सून पद्मिनी सुप्रिया यांनी लिफ्टमध्ये बिघाड असल्यामुळे सासूचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील श्री साई सोसायटीमधील लिफ्टमधील बिघाडामुळे वयोवृद्ध महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना उघडकीस आली आहे. नीलिमा चौधरी वय ५८ असं मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी मृत महिलेच्या सूनेनं सांगवी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नीलिमा पिंपळे सौदागर येथे असणाऱ्या आपल्या मुलाकडे दिवाळीच्या सुट्टीसाठी आल्या होत्या. २३ ऑक्टोबरला लिफ्टमध्ये झालेल्या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीलिमा चौधरी यांचा मुलगा अमित आनंद पिंपळे सौदागर येथील साई श्री सोसायटीमधील सातव्या मजल्यावर राहतात. आपल्या नातवाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नीलिमा रुग्णालयात जाण्यासाठी निघाल्या होत्या. २३ नोव्हेंबरला नातेवाईकांसोबत त्या लिफ्टमधून खाली उतरल्या. मात्र, मोबाईल आणि पर्स घरीच राहिल्याचे लक्षात आल्यानंतर त्या पुन्हा घरी आल्या. मोबाईल आणि पर्स घेऊन जात असताना लिफ्टचे बटन प्रेस केल्यानंतर लिफ्ट वर आलीच नाही. मात्र, त्या मजल्यावरील लिफ्टमध्ये शिरण्याचा दरवाजा उघडला. काही कारणामुळे ही गोष्ट नीलिमा यांच्या लक्षात आली नाही आणि त्यांनी लिफ्ट नसलेल्या मोकळ्या जागेत प्रवेश केला. त्यानंतर आत पाऊल टाकताच नीलिमा थेट सातव्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर असलेल्या लिफ्टच्या छतावर कोसळल्या. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी नीलिमा यांची सून पद्मिनी सुप्रिया यांनी लिफ्टमध्ये बिघाड असल्यामुळे सासूचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यासंबंधीचा अहवाल पोलिसांना मिळाल्यानंतर पुढील कारवाई होणे, अपेक्षित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2017 1:43 pm

Web Title: woman died after lift slab collapse on her head in pimpari chinchwad
Next Stories
1 देशात-राज्यात हुकूमशाही व ठोकशाहीच्या दिशेने वाटचाल
2 ‘…तर बुलेट ट्रेनने सरकारने शेतकऱ्यांना परदेशातच पाठवले असते’
3 माझ्याकडे आयसीसीचे नेतृत्त्व आल्यानं पुणेकरांच्या मनातील खंत दूर- शरद पवार
Just Now!
X