27 February 2021

News Flash

१९ व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; दोन जण जखमी

जखमींवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

म्हाडा इमारतीचे काम सुरू असताना १९ व्या मजल्यावरून खाली पडल्याने कामगाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घडली आहे. राजकुमार अशोक घोसले (२४) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर इतर दोघे जण जखमी असून बाबुराव यादव आणि करण यादव, अशी त्यांची नावे आहेत.

मयत राजकुमार आणि इतर दोन कामगार हे क्रेनवर उभे राहून इमारतीच्या १९ व्या मजल्यावर प्लाष्टरचे काम करत होते. तेव्हा, क्रेनचे ब्रेक निकामी झाल्याने ते खाली पडले. यात राजकुमार याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमध्ये म्हाडाच्या इमारतीचे काम सुरू आहे. मयत राजकुमार आणि दोन कामगार हे क्रेन वर उभे राहून सेफ्टी बेल्ट वापरून १८ आणि १९ व्या मजल्यावर प्लाष्टरचे काम करत होते. तेव्हा अचानक उभा असलेल्या क्रेनचे ब्रेक निकामी झाले आणि कामगार थेट खाली पडले. यात राजकुमार हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने महानगर पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

तर बाबुराव यादव आणि करण यादव हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कामगारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, सेफ्टी बेल्ट असताना कामगार खाली पडलेच कसे असा प्रश्न निर्माण होत असून घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. राजकुमार हा मूळचा छत्तीसगड येथील आहे. तो पिंपरी-चिंचवडमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2019 3:52 pm

Web Title: workers fell from 19th floor building one dead two injured jud 87
Next Stories
1 Video: पुण्यात अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान ज्येष्ठ महिलेला महिला पोलिसांची मारहाण
2 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव कार लोखंडी बॅरिकेट्सला धडकली, चालक गंभीर
3 पुण्यात गाड्या पेटवण्याचे सत्र सुरुच; ७ दुचाकी जाळल्याने खळबळ
Just Now!
X