पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने २०५३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या १,०७, ९५८ एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर २,५४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १६३९ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आजअखेर ८८, ५७९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

तर पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी १,२६९ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर २४ जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तर ६७६ जण करोनातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ५६,४९३वर पोहचली असून यांपैकी, ४४,६१८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ५, ९९३ एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.