राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत सुवर्ण पदकाची कमाई करणारा कुस्तीपटू राहुल आवारे याला लवकरच पोलीस उपअधीक्षकपदी (डीवायएसपी) नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून याची लवकरच घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुण्यात दिली.

पुण्यात राहुल आवरेच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची परिपूर्ती होत असल्याचे सांगितले. त्यानुसार राहुलला पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असून त्याची लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…
The decision to take Eknath Shinde and Ajit Pawar along with them is the BJP leaders in the state
एकनाथ शिंदे,अजित पवार यांना बरोबर घेण्याचा निर्णय राज्यातील भाजप नेत्यांचाच! केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा दावा

ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्ती स्पर्धेत राहुल आवाराने ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते. राहुल आवारेच्या या कामगिरीमुळे सर्वच क्षेत्रातून त्याचे कौतुक होत आहे.