पिंपरीः निघोजे येथील महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीच्या कामगारांना १२ हजार ८०० रुपयांची वेतनवाढ मिळाली आहे. कंपनीचे व्यवस्थापन आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यात हा वेतनवाढ करार झाला. कराराचा कालावधी १ नोव्हेंबर २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२६ असा साडेतीन वर्षांचा राहणार आहे.

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
The debut of Bharti Hexacom itself gave investors a return of 43 percent
‘भारती हेक्साकॉम’चा पदार्पणालाच गुंतवणूकदारांना ४३ टक्क्यांचा परतावा
Goshta Asamanyanchi Dadasaheb Bhagat
गोष्ट असामान्यांची Video: इन्फोसिसमध्ये ऑफिस बाॅय ते दोन स्टार्टअप्सचा संस्थापक – दादासाहेब भगत
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी

संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे, रोहिदास गाडे, महिंद्रा कंपनीचे उपाध्यक्ष विजय नायर, उद्योजक संतोष शिंदे, अध्यक्ष जीवन येळवंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वेतनवाढ करार करण्यात आला. संघटनेकडून किसन बावकर, कृष्णा रोहोकले, रघुनाथ मोरे, शाम सुळके, अमृत चौधरी, तेजस बिरदवडे तर व्यवस्थापनाच्या वतीने महिंद्रा कंपनीचे उपाध्यक्ष प्रसन्ना पहाडे,  एडविन लोबो, प्रदीप झोटिंग, जोगिंदर सिंग, सुनील धानोरकर, श्रेयस आचार्य, शेखर करंजीकर यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप झोटिंग यांनी केले. सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी केले. कृष्णा रोहोकले यांनी आभार मानले.