पुणे : महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट म्हाळुंगे गावातील वीस ते पंचवीस घरात पाणी शिरल्याची घटना घडली. औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाकडून पंप आणि जेसीबीच्या माध्यमातून बाधित घरातील पाण्याचा निचरा करण्यात आला.
महापालिका हद्दीत काही वर्षांपूर्वी म्हाळुंगे गावाचा समावेश झाला आहे. शहरात झालेल्या मुसळधार पावसाने या गावातील वीस ते पंचवीस घरांमध्ये वेगाने पाणी शिरले. बाधित लोकांनी औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाकडे संपर्क साधल्यानंतर अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, क्षेत्रीय कार्यालयाचे उपायुक्त नितीन उदास यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तीन जेसेबी आणि दोन पंपांच्या सहाय्याने कर्मचारी वर्गाने पाण्याचा निचरा केला. कमीत कमी वेळेत घरातील पाणी कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले. महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे, उपअभियंता संजय आदीवंत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक सुरेंद्र जावळे, मोकादम प्रकाश सोवळे, आकाश शिंदे, भाऊ जाधव सर्व महापालिका औंध येथील अधिकारी व कर्मचारी यांनी कमीत कमी वेळात काम पूर्ण केले.