पुणे : आपले हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. वाढत्या महागाईच्या काळात या स्वप्नातील घरासाठी अनेकांची धडपड सुरू असते. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) गरजू नागरिकांना बाजारभावापेक्षा कमी दराने घरे उपलब्ध करून दिली जातात. त्याकरिता लॉटरी काढण्यात येत असते. मात्र, म्हाडा पुणे मंडळातील तब्बल अडीच हजार घरे ही पडून असल्याची माहिती समोर आली आहे. या घरांची वारंवार लॉटरी काढूनही विक्री होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता यावर उपाय योजण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

म्हाडाकडून बाजारभावापेक्षा कमी किंमतीमध्ये गरजू नागरिकांना घरे उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, अनेकदा विविध योजनांमधील घरांची विक्री होत नाही. त्यामुळे पुढील सोडतीमध्ये ही घरे पुन्हा उपलब्ध करून देण्यात येतात. गेल्या काही वर्षांपासून ठराविक योजनांमधील काही घरांची विक्री होत नसल्याचे समोर आले आहे. पडून असलेल्या या घरांसाठी वारंवार सोडत काढण्यात आली. तसेच ही घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेत समाविष्ट करण्यात आली. तरीही त्यांची विक्री होऊ शकली नाही. राज्यात म्हाडाची अशी ११ हजारांहून अधिक घरे विक्रीविना पडून आहेत. त्यांची एकत्रित किंमत सुमारे तीन हजार कोटी रुपयांहून अधिक आहे.

Eid Miladunnabi utsav Committee Buldhana organized blood donation camp
बुलढाणा : संकलन साहित्य संपले, पण रक्तदात्यांची रांग कायम!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Prajwal Revanna Rape Victime
Prajwal Revanna Chargesheet: ‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस
rahul gandhi statement in america, prime minister narendra modi
राहुल गांधीनी मोदींच्या पावलावर पाऊल टाकलं तर एवढं काय बिघडलं?
human personality mask
जिंकावे नि जगावेही: मुखवट्यांच्या आड
retirement planning, financial freedom, emotional aspects, senior financial planning, peace of mind, financial mentor, heritage, family values, mental preparation,
निवृत्तीच्या उंबरठ्यावरचं अर्थकारण!
Kaustubh Pandharipande faces a big challenge of kidney disease
नागपूर : माळरानाच्या संवर्धकासमोर किडनी आजाराचे मोठे आव्हान
parental challenges, children s independence, generational tensions, family dynamics, emotional support, parent child relationship,
सांधा बदलताना : कळा ज्या लागल्या जीवा

हेही वाचा >>>पुणे : प्राणिसंग्रहालयातून पसार झालेल्या बिबट्याचा ठावठिकाणा लागेना! अठ्ठेचाळीस तासानंतरही शोध घेण्यात अपयश

या पार्श्वभूमीवर अशा घरांची विक्री खासगी संस्थेमार्फत करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्यानुसार म्हाडाचे संबंधित मंडळ निविदा प्रक्रिया राबवून बांधकाम, मार्केटिंग क्षेत्रांतील संस्थेची नियुक्ती करणार आहे. खासगी संस्थेच्या माध्यमातून घर खरेदी करणाऱ्यांना सुरुवातीला त्याच्या एकूण किंमतीच्या २५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे, तर उर्वरित ७५ टक्के रक्कम मासिक हप्त्यांनी भरण्याची मुभा असणार आहे.संस्थेला प्रत्येक सदनिकेच्या, भूखंडाच्या विक्री किंमतीच्या पाच टक्के रक्कम मोबदला म्हणून दिली जाणार आहे.